Water Shortage : जायकवाडी धरणात फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक; उद्योगांवर पाणी कपातीचं सावट

Water Shortage : मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा केवळ १८ टक्के शिल्लक राहिला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांची चिंता वाढलीये. कारण पाणीसाठा कमी शिल्लक राहिल्याने उद्योजकांना पाणी कपातीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यातच पाणीसाठा हा १८ टक्क्यांवर आल्यानं येत्या काळात पिण्यासाठी पाणी राखीव ठेवले जाऊ शकते,अशी शक्यता वर्तवली जात आहे.

उद्योगांच्या पाणी कपातीबाबत सध्यातरी कोणताही निर्णय प्रशासनाने घेतला नाहीये. मात्र आगामी काळात परिस्थिती चिंताजनक राहिली तर उद्योगांच्या पाणीकपातीचा विचार करू असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटले आहे.

Unseasonal Rain : चांदूरबाजार परिसरात गारपीटसह वादळी वाऱ्याचा पाऊस; गहू, कांद्याचे नुकसान

२०१६ साली एप्रिल महिन्यात उद्योगांना पाणीकपात

२०१६ साली एप्रिल महिन्यात उद्योगांच्या पाणीकपातीचा निर्णय झाला होता. त्यानंतर आठ वर्षांनी तशी परिस्थिती ओढावते की काय अशी परिस्थिती सध्या मिर्माण झाली आहे.

यंदा मराठवाड्यातील बहुतांश भागात दुष्काळी स्थिती आहे. जायकवाडीत धरणातून संभाजीनगर, जालना या मोठ्या शहरांसह जवळपास ४२ पाणीपुरवठा योजनांमार्फत पाण्याचे वितरण केले जाते. शिवाय जिल्ह्यासह गोदाकाठाच्या आणि डाव्या -उजव्या कालव्यावर दोन ते अडीच लाख शेतकरी अवलंबून आहेत.

सध्या संभाजीनगर शहराला रोज १३५ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. तर उद्योगांना ५२ एमएलडी पाणी उपसा होतोय. शहराला रोज २ दसलक्ष घन मीटर पाणी लागते. जायकवाडीच्या मृत जलसाठ्यातून साधारणतः दीड वर्ष पाणीपुरवठा होणे शक्य आहे.

मात्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने काही दिवसांनी पाणी राखवी ठेवले जाऊ शकते. मराठवाड्यासह विदर्भात देखील नागरिकांना पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो. धरणांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने एप्रिल महिन्यातच अशी परिस्थिती तर मे आणि जून अखेरपर्यंत पाणी पुरणार का? या विचारांनी ग्रामस्थ चिंतेत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply