पुणे : सूस, म्हाळुंगे, बावधनसाठी पाणी योजना; १७७ कोटींच्या पूर्वगणनपत्राला मान्यता

पुणे : महापालिका हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या सूस, बावधन आणि म्हाळुंगे गावासाठी महापालिका प्रशासनाकडून पाणी योजना हाती घेण्यात आली आहे. त्यासाठीच्या १७७ कोटींच्या पूर्वगणनपत्राला मंजुरी देण्यात आली आहे. पाणी योजनेचा आराखडा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

महापालिका हद्दीमध्ये ऑक्टोबर २०१७ मध्ये ११ गावांचा तर गेल्या वर्षी २३ गावांचा समावेश करण्यात आला. समाविष्ट गावांमधील पाणीटंचाईबाबत प्रशासनाकडे स्थानिक नागरिकांनी, राजकीय नेत्यांनी तक्रारी प्रशासनाकडे केल्या होत्या. यासंदर्भात उच्च न्यालालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. त्याअंतर्गत सूस, म्हाळुंगे आणि बावधन या तीन गावातील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणी योजनेचा आराखडा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

पाणी योजनेसाठी १७७ कोटींचा आराखडा असून खर्चाचे पूर्वगणनपत्राला मान्यता देण्यात आल्याची माहिती आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली. या तीन गावांबरोबरच वाघोली, मांजरी, खडकवासला आणि अन्य उर्वरीत गावांसाठी येत्या ३० जून पर्यंत पूर्वगणन तयार करण्याची सूचना आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांना केली आहे.

शहरातील सर्व भागाला समन्यायी पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. योजनेनुसार सर्वांना चोवीस तास पाणीपुरवठा होणार आहे. योजनेअंतंर्गत नव्याने १ हजार ८०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्याबरोबरच जुन्या, जीर्ण जलवाहिन्यांची दुरुस्ती, ८७ साठवणूक टाक्यांची उभारणी आणि निवासी तसेच व्यावसायिक मिळकतींना जलमापके बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही योजना समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्येही राबविण्याचे नियोजित आहे. त्यासाठी महापालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली आहे. सूस, म्हाळुंगे आणि बावधन या गावातून समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाला प्रारंभ होणार आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply