Washim Water Crisis : वाशिममध्ये पाणीटंचाई गडद; १ हजार लिटर पाण्यासाठी मोजावे लागताय २५० रुपये


Washim : पाणी टंचाईची समस्या आता दिवसेंदिवस गडद होत चालली आहे. एक तर डोक्यावर दूरवरून पाणी आणावे लागत आहे. तर काही ठिकाणी विकत पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यानुसार वाशिम शहरात १ हजार लिटर पाण्याच्या टाकीसाठी तब्बल २५० रुपये. तर ३ हजार लिटर पाण्याच्या टँकरसाठी ४०० ते ४५० रुपये मोजावे लागत आहेत.

राज्यभरात उन्हाच्या तीव्र झळा जनविण्यास सुरवात झाली आहे. यासोबतच पाण्याची तीव्र टंचाईला देखील सामोरे जावे लागत आहे. काही भागात मार्च महिन्यापासूनच पाण्याची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. तर आता उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याचे स्रोत आटत आहेत. यामुळे गावांमध्ये टंचाईचा सामना करावा लागत असल्याने आता वाशीम शहरात नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.

Tulajapur Drug Case : मोठी बातमी! तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांचा सहभाग; १३ जणांची नावं समोर

हजार लिटर पाण्यासाठी २५० रुपये वाशिम शहरात उन्हाळा लागताच अनेक नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नगरपालिकेकडून पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र काही भागांत तीव्र पाणीटंचाई जाणवत असतांना या भागांतील नागरिकांना १ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीसाठी तब्बल २५० रुपये मोजावे लागत आहेत. तर ३ हजार लिटर पाण्याच्या टँकरसाठी ४०० ते ४५० रुपये इतका खर्च येतो.

दोन महिने पाण्याची समस्या

वाशीम शहरात आतापासून पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे. यामुळे शहरातील नागरिकांना ट्रॅकरचा आधार घ्यावा लागत आहे. पाणी टंचाईची हि समस्या पुढील दोन महिने तरी कायम राहणार आहे. तसेच यंदा पावसाळा लांबल्यास टंचाईची समस्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे पुढील दोन- अडीच महिने पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply