Washim Accident: ७ मिनिटांच्या फरकाने एकाच ठिकाणी २ अपघात, रिसोड-हिंगोली मार्गावरील घटना; १२ जण गंभीर जखमी

Washim : वाशिममध्ये अपघाताच्या दोन घटना घडल्या आहेत. वाशिमच्या रिसोड ते हिंगोली मार्गावर अपघाताच्या या घटना घडल्या आहेत. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे एकाच ठिकाणी दोन वेगवेगळ्या अपघातात १२ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सात महिलांचा समावेश आहे. या अपघाताचा तपास वाशिम पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिसोडवरून हिंगोलीच्या दिशेने जात असलेल्या एका कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीमध्ये पडली. सुदैवाने गाडीतील एअर बॅग उघडल्याने कारमधील तीन जन किरकोळ जखमी झाले. तर याच ठिकाणी दुसरा अपघात देखील झाला. अवघ्या ७ मिनिटांनंतर रिसोडकडे येत असलेली क्रुझर ही रस्त्याचा अंदाज न आल्याने थेट मातीच्या ढिगाऱ्यावर चढली.

या अपघातामध्ये ९ जण जखमी झाले आहेत. या दोन्ही अपघातांमध्ये १२ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिलांचा देखील समावेश आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या सर्वांना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचारामध्ये सायराबी सरदार खान आणि शमीम परविन एजाज खान यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी वाशीम येथे दाखल करण्यात आले आहे.

Goa paragliding accident : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठा अपघात, पुण्यातील तरूणीसह पायलटचा मृत्यू

दरम्यान, मनमाडमधील नगर-मनमाड महामार्गावर सातत्याने अपघातांची मालिका सुरु असून येवल्याच्या पिंपळगाव जलाल टोक नाक्याजवळ भरधाव आयशर ट्रकने गतीरोधकाजवळ अचानक ब्रेक दाबल्याने पाठी मागून येणारा कंटेनर त्यावर धडकला. या धडकेनंतर आयशर ट्रक पुढे जाऊन पलटी झाला.

अपघातामध्ये कंटेनरच्या पुढील भागाचा चक्काचूर होऊन त्यामध्ये चालक अडकला. त्याला बाहेर काढण्यासाठी अखेर जेसीबीची मदत घेण्यात आली. यावेळी तातडीने चालकाला येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले.

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply