Wardha News : CM शिंदेंच्या वाहनाचे स्टेअरिंग फडणवीसांच्या हाती; समृद्धी महामार्गाची केली पाहणी

वर्धा : नागपूर येथून समृद्धी महामार्गास प्रारंभ होत असून तेथून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पाहणी दौरा सुरु केला. वर्धा जिल्ह्यात समृद्धीचा 55 किलोमीटरचा मार्ग असून या मार्गाची पाहणी करण्यात आली. यावेळी एकाच वाहनात मुख्यमंत्री आणी उपमुख्यमंत्री होते. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः वाहन चालवित मुख्यमंत्री शिंदे यांचे सारथी बनले होते. 

 
वर्धा जिल्ह्यात सेलू, वर्धा व आर्वी या तालुक्यातून महामार्ग जात आहे. एकुण लांबी 55 किमी आहे. महामार्गाची रुंदी 120 मीटर असून सदर मार्ग 6 पदरी आहे. मार्गावर 5 मोठे व 27 लहान अशा 32 पुलांचा समावेश आहे. महामार्गावरील वाहतुक विना अडथळा होण्यासाठी 9 ठिकाणी उड्डान पूल उभारण्यात आले आहे. येळाकेळी व विरुळ येथे इंटरचेंजेस देण्यात आले आहे. वन्यप्राण्यांचा संचार असलेल्या भागात दोन ठिकाणी उन्नत मार्ग आहे. महामार्गासाठी 782 हेक्टर जमीनीचे अधिग्रहन करण्यात आले आहे तर 2 हजार 762 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply