Wardha News : दारूबंदी जिल्ह्यात दारू पुरवली तर बारमालकांचे परवाने होणार रद्द; २५ बारचे परवाने रद्दबाबत प्रस्ताव

Wardha News : वर्धा जिल्हा दारूबंदी असतानाही लगतच्या जिल्ह्यातील काही बारमालक, वाईन शॉप मालक बिनधास्तपणे जिल्ह्यात दारूचा पुरवठा करीत आहेत. मात्र आगामी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस ऍक्शन मोडवर आले असून आता वर्धा जिल्ह्यात दारूचा पुरवठा करणाऱ्या बार मालकाचे थेट बार आणि वाईन शॉप परवाना रद्द करण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविण्याची प्रक्रिया वर्धा पोलिसांनी सुरू केली आहे.

जिल्ह्याला महापुरुषांचा वारसा लाभला असून जिल्ह्याची ओळख संपूर्ण जगात आहे. १९७४ मध्ये वर्धा जिल्हा दारूबंदी म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत ही दारूबंदी केवळ फोल ठरल्याचेच सर्वसामान्यांनी अनुभवले आहे. जिल्ह्यात पूर्णतः दारूबंदी होण्यासाठी अनेक तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी तसेच विविध सामाजिक संघटनांनी विविध उपाययोजना राबविल्या. मात्र, त्यांना हवे तसे यश आले नाही. पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी पदभार स्वीकारताच सर्वांत पहिले दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या धडक कारवाईमुळे दारू विक्रेते सैरभैर झाले. अनेकांनी जिल्हा सोडून पळ काढला. जवळपास शंभरावर दारू विक्रेत्यांना तडीपार केले. 

Pachora Crime News : एकाच रात्री दोन मंदिरातील दानपेटी फोडल्या; पाचोऱ्यातील घटना

आता परवाने रद्दची कारवाई 

जिल्ह्यालगत जवळपास शंभरावर बार आणि वाईन शॉप आहेत. वर्धा जिल्हा दारूबंदी जिल्हा असल्याचे माहिती असतानाही काही बार आणि वाईन शॉपमालक परवान्याचे उल्लंघन करून दारू पुरवतात. अशा बारमालकांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम ८२ अन्वये गुन्हा होतो. ज्या बारमालकांवर पाचपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशांचा बार परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply