Car Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ओव्हरटेक करताना चालकाला डुलकी; बॅरिकेटला धडकून कार उलटली

Wardha : प्रयगराज येथून कुंभ स्नान करून निघालेल्या भाविकांच्या वाहनाला समृद्धी महामार्गवरील येळाकेळी परिसरात अपघात झालाय. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. येळाकेली परिसरात ओव्हरटेक करत असताना कार चालकाला डुलकी आली त्यामुळे कारवरील ताबा सुटला. स्टेअरिंगवरील ताबा सुटल्यामुळे कार थेट बॅरिकेटला धडकली त्यानंतर उलटी झाली. हाती आलेल्या माहितीनुसार, कारमधील सर्व प्रवासी हे शिर्डी येथे जाते होते.

मिळालेल्या माहितीनुसार,बेंगळुरूच्या कुडलो येथील रहिवासी नरेश व्यंकटेश (वय 35) हे आपल्या कार क्रमांक केए 51 एमएक्स 8761 ने प्रयागराज ते नागपूर मार्गे शिर्डी जात होता. यावेळी नरेशसोबत त्याची पत्नी रमेश्री (32), बहिण शकुंतला (50), चालक नरेशचा मुलगा पूर्विक नरेश (6), मित्र संजय नाझंया (40) कारमध्ये सवार होते. समृद्धी महामार्गवरून कार वर्ध्यापासून जात होती.

Mumbai : कम्प्युटरमध्ये तांत्रिक अडचणी सांगून फसवणूक, मुंबईत बसून अमेरिकन नागरिकांना गंडवलं; मुंबईत खळबळ

येलाकेली जवळ समोर जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना कार पलटी होत बॅरिकेटला धडकली. यात नरेश गंभीर जखमी झाला आणि अपघातात कारमधील रमेश्री आणि शकुंतला दोन्ही महिलांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चालकाची बहिण आणि पत्नी आहेत. तर संजय आणि पूर्विक जखमी झाले. जखमींचं प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहचली. सोबतच सावंगी मेघे पोलीस स्टेशनची टीम सुद्धा दाखल झाली आहे. महामार्ग पोलिसांनी सीआरओ मुंबई, नागपूर यांना अपघाताची माहिती दिली. महामार्ग पोलीसचे पीएसआय दिलीप थाटे आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या मदतीने कारला रस्त्यापासून दूर करून वाहतूक सुरळीत केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply