Walmik Karad : वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न धनंजय मुंडेंनी केला होता, कासलेंच्या नव्या व्हिडिओने खळबळ

Walmik Karad encounter plan : निलंबित पीएसआय रणजीत कासलेंनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केला आहे. वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर होती, असा दावा त्यांनी फेसबुक व्हिडिओत केला होता. त्यामध्ये कासले यांनी आता धनंजय मुंडे यांचे नाव घेतलेय.

वाल्मिक कराडचा (Walmik Karad) एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला होता, असा खळबजनक दावा रणजीत कासले यांनी केला आहे. कासले यांनी नवा व्हिडिओ फेसबूकवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी केलेल्या दाव्याने बीड आणि राज्यात खळबळ उडाली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर होती, असा दावा निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी सोमवारी केला होता. आज त्यांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे.

Sanjay Raut : १५००, ५०० अन् आता लाडकींची किंमत ०, लाडकी बहीण योजनेबाबत दावा करत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराडचा एन्काऊंटरचा प्रयत्न केला होता. कारण त्यांन ते नको होते. वाल्मिक कराड त्यांचे अंडी पिल्ली बाहेर काढणार होते. त्यामुळे ते खुनाचा आरोपात सहरोपी झाले असते, असा दावा वादग्रस्त निलंबित पीएसआय अधिकारी रणजित कासले यांनी केलाय. धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे. संतोष देशमुख प्रकरणात अनेक पुरावे दाबले गेले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे सहआरोपी होणार नाहीत, असा दावाही रणजीत कासले यांनी केलाय

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेनंतर वाल्मिक कराड याला बीड तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. मात्र याच तुरुंगात कराडचा काटा काढण्यासाठी ५० कोटी रूपयांर्यंतची ऑफर दिल्याचा दावा रणजित कासलेंनी केला. त्या प्रकरणात त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेतले आहे. धनंजय मुंडे यांच्याकडून अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply