Walmik karad : वाल्मिक कराडची पोलीस कोठडी संपली; जेल की बेल? आज होणार सुनावणी


Walmik karad News Update : खंडणी प्रकरणात कोठडीत असणाऱ्या वाल्मिक कराड याला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. वाल्मिक कराड याला पुन्हा कोठडी मिळणार की बेल मिळणार? यावर सुनावणी होणार आहे. वाल्मिक कराड याने जामीनासाठीही कोर्टात धाव घेतली आहे, त्याबाबतचाही निर्णय होण्याची शक्यता आहे. आज दुपारी कराडला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेय. मागील सुनावणीवेळी खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र त्यानंतर वाल्मीक कराडवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कोर्टाने मकोका गुन्ह्यात वाल्मीक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र ही पोलीस कोठडी आज संपली आहे. कराडच्या मकोका गुन्ह्यात आज बीड जिल्हा न्यायालयात दुपारी सुनावणी होणार आहे.

Akola Shocking News : शिक्षकाचा प्रताप! शिक्षकानं पाटी देण्याऐवजी हातात दिली बाजाराची पिशवी, अकोल्यातील संतापजनक घटना

दरम्यान, वाल्मीक कराडला बीड जिल्हा न्यायालयात ज्यावेळेस हजर केलं होतं. त्यावेळेस मोठा गोंधळ उडाला होता. त्यामुळे त्यानंतर सुदर्शन घुलेसह सहा जणांची सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली होती. त्यामुळे आजची कराडची सुनावणी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या सुनावणी कडे आता राज्याचे लक्ष लागलंय.

पोलीस अधीक्षक नवनीत कावत ॲक्शन मोडवर; गुन्हेगारांवर लावणार एसपीडीए, मोक्का

बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी वरून बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत ॲक्शन मोडवर आले आहेत.. जिल्ह्यातील गुन्हेगार आणि विविध माफिया आता पोलीस प्रशासनाच्या रडारवर असल्याचं पाहायला मिळत आहेत..गुन्हेगारी क्षेत्रातील सर्वांच्याच गुन्हेगारीचे रेकॉर्ड त्यांनी मागविले होते..त्यानुसार त्यांना गुन्हेगारांचे रेकॉर्ड प्राप्त झाले असून आता त्यांनी गुन्ह्यांच्या कुंडलीनुसार मोक्का, एमपीडीए, तडीपारीच्या कारवाईला सुरवात केली आहे. विशेष म्हणजे वाळू, गुटखा, भुमाफियांवरही ते मोक्क्यासारखी कडक करवाई करणार आहेत. त्याचबरोबर खोटे गुन्हे दाखल केले तर फिर्यादीवर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिलाय.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply