Walmik Karad : वाल्मिक कराडचा वाकडमध्ये 4 BHK फ्लॅट, किंमत 3.15 कोटी रूपये

Walmik Karad Property : वाल्मिक कराडने गुन्हेगारी मार्गाने कमावलेल्या पैशातून वेगवगेळ्या शहरांत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आमदार सुरेश धस आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी केलाय. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या मार्गाने पैसे कमावल्याचा आरोप होतोय, त्यातूनच पिपंरी चिंचवडमध्ये वाल्मिक कराडने साडेतीन कोटींचा फ्लॅट घेतल्याचे समोर आलेय. वाल्मिक कराडने वाकडमध्ये पत्नी आणि स्वत:च्या नावावर कोट्यवधींचा फ्लॅट घेतल्याचं समोर आलेय.

बीडच्या मस्साजोग ग्रामपंचायतचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्या गडगंज संपत्ती बाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात देखील वाल्मीक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे फ्लॅट असल्याचे समोर आलेय. वाकडमधील पार्क स्ट्रीट सोसायटीच्या पार्क आयव्हरी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर 601 नंबर फ्लॅट कराडने घेतलाय. कराडच्या या 4 BHK फ्लॅटची किंमत ३.१५ कोटींपेक्षा जास्त आहे.

वाकडमधील कराड याच्या 4 BHK फ्लॅट फ्लॅटची किंमत 3.15 करोड पेक्षा अधिक आहे. धक्कादायक बाब म्हणजे कराडने या त्याचा फ्लॅटचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मिळकत कर भरला नाही. त्यामुळे कर संकलन विभागाने त्याच्या या फ्लॅटवर नोटीस सुद्धा लावली आहे. वाल्मिक कराड याला एक लाख ६८ हजार ८६४ रूपयांचा कर भरलेला नसल्यामुळे नोटीस पाठवण्यात आलेली आहे.

पिंपरी चिंचवड मनपाने नोटीसमध्ये काय म्हटलेय ?

वा‌ल्मिक बाबुराव कराड व मंजली वा‌ल्मिकराव कराड राहणार स.नं.214/2/1 ते 10, 215/1 ते 4, पार्क स्ट्रीट, पार्क आपवरी फेज 2, फ्लॅट नं. H/601, सहावा मजला, औंधरोड, वाकड, पुणे 57. यांनी त्यांचे उक्त पत्यावरील मालमत्ता क्रमांक 1040125144.00 चा सन 2023-2024 या आर्थिक वर्षाअखेर मालमत्ता कराबद्दल येणे असलेली रक्कम रुपये 108,864/-भरलेली नाही, किंवा ती न भरण्याबद्दल माझे समाधान होईल असे पुरेसे कारण दाखविलेले नाही. वा‌ल्मिक बाबुराव कराड व मंजली वा‌ल्मिकराव कराड यांचेकडे उक्त रकमेची रितसर लेखी मागणी करण्यात आली असून जप्ती पूर्वीची नोटीस बजाविलेपासून विहित कलावधी संपलेला आहे.

वा‌ल्मिक बाबुराव कराड व मंजली वा‌ल्मिकराव कराड यांची उक्त किंमतीची आणि उक्त रकमेच्या वसुलीचा खर्च भरून निघण्यास पुरेशी होईल अशा आणखी रकमेच्या किमतीची जंगम मालमत्ता अटकावून ठेवावी. कोणतीही मालमत्ता (किंवा यथास्थिती, ज्या जागेच्या) बाबतीत उक्त कर पेणे असेल त्या जागेवरील कोणतीही जंगम / स्थावर मालमत्ता जप्त करावी. आणि या अधिपत्रान्वये तुम्ही जप्त केलेल्या मालमत्तेचा / अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेचा सर्व तपशिल प्रमाणित करून तो, या अधिपत्रासह ताबडतोब माझेकडे सादर करावा.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply