Walmik Karad : वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर करणार, सीआयडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

Walmik Karad to Surrender at CID Office Today : बीडमधील खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मीक कराड सीआयडी ऑफिसमध्ये सरेंडर करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज ११ वाजता वाल्मीक कराड पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये सरेंडकर करणार आहे. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील कायदा सुव्यस्था राज्यात चर्चेचा विषय झाली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मीक कराड यांचे नाव समोर आले होते.

संतोष देशमुख हत्या प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्यानंतर तपासाला वेग आला. त्यांनी वाल्मीक कराड याच्या निकटवर्ती लोकांची कसून चौकशी केली. त्याशिवाय पासपोर्ट रद्द करण्याची सरकारकडे मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर वाल्मीक कराड यांची सर्व बँक खाती फ्रीज करण्यात आली.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड तीन आठवड्यांपासून फरार आहे. आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. त्यामध्ये वाल्मीक कराड याचेही नाव आहे. वाल्मीक कराड याचा शोध सीआयडीकडून घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कराड आज ११ वाजता सरेंडर करणार आहे. वाल्मीक कराडचे अनेक कार्यकर्ते सीआयडीच्या कार्यालयाबाहेर दाखल झाले आहेत.

Pandharpur News: पंढरपूर भाविकांनी फुललं, तब्बल 53 कोटी 97 लाख रुपये विठुरायाच्या चरणी दान

आम्ही सीआयडीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत. वाल्मीक कराड हे आरोपी नाहीत. ते खंडणीचा त्यांच्यावर खोटा आरोप, गुन्हा दाखल केला असल्याचे समर्थकांचे म्हणणं आहे. बीड आणि अहमदनगरवरून आलेल्या समर्थकांनी सीआयडी कार्यालयाबाहेर गर्दी केली.

पुण्यातून चार सीआयडीची विशेष पथके वाल्मीक कराडच्या शोधासाठी रवाना झाले आहे. पुण्यातून पहाटे २ तर सकाळी १ पथक वाल्मिक कराडच्या शोधासाठी रवाना झाले आहेत. वाल्मीक कराड आज सीआयडीच्या कार्यलयात सरेंडर करणार असल्याची माहिती समोर येत असली, तर सीआयडीकडून तपास आणि शोध सुरूच ठेवला जात आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराडचे नाव घेतले जातेय. सीआयडीने वाल्मीक कराडच्या भोवती तपासाचा फास आवळला आहे. त्याच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी केली. त्याशिवाय सर्व बँक खाती फ्रीज करण्यात आली. त्यामुळे अडचणीत सापडलेला वाल्मीक कराड आज सरेंडर करणार असल्याचे बोलले जातेय.

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply