Wada Accident News : मातीने भरलेल्या डंपरने बाप लेकाला चिरडले; केळठण- गोराड रस्त्यावर झाला अपघात

Wada Accident News :  मुलाला केस कापण्यासाठी मोटारसायकलवर जात असताना भरधाव वेगाने आलेल्या डंपरने दुचाकीला धडक दिली. यात दोन्ही रस्त्यावर फेकले गेले. यानंतर त्यांच्या अंगावरून मातीने भरलेले  डंपर गेल्याने ९ वर्षीय मुलासह पित्याचा देखील मृत्यू झाला आहे.

मुंबई- अहमदाबाद द्रुतगती महामार्गाचा माती भरावाचे काम सुरू आहे. यासाठी डंपर माती घेण्यासाठी येतात. अशाच एका भरधाव वेगाने येणाऱ्या डंप्परने मुलगा साहिल वड (वय ९) व वडील सचिन वड या दोघा बापलेकाला चिरडले. मुलगा साहिल याचा जागीच मृत्यू झाला होता. तर वडील सचिन याला ठाणे येथे उपचारासाठी घेऊन जात आसताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे महामार्गावर काम करणाऱ्या डंप्पर ने माती वाहतूक करणाऱ्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. 

Latur Accident : कार- ट्रॅक्टरचा भीषण अपघात; चोघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ शिक्षकांचा समावेश

केस कापण्यासाठी जाताना झाला घात  

वाडा तालुक्यातील केळठण - गोराड रस्त्यावर हा अपघात झाला आहे. दरम्यान मुलगा साहिल यास केस कापण्यासाठी केळठणला मोटरसायकलने घेऊन जात होते. याच दरम्यान डंपरने धडक दिल्याने सदर अपघात झाला.  

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply