Virat Kohli Orange Cap : 'ऑरेंज कॅप IPL ट्रॉफी जिंकून देत नाही....', CSKच्या माजी खेळाडूने विराट I कोहलीला पुन्हा मारला टोमणा

Ambati Rayudu on Virat Kohli Orange Cap : आयपीएल 2024 चा हा सतरावा हंगाम संपला आहे.श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून ट्रॉफी जिंकली आहे. कोलकात्याची ही तिसरी आयपीएल ट्रॉफी आहे.

विराट कोहलीने या हंगामातच्या सुरुवातीला अरिंज कॅपच्या शर्यतीत आघाडी घेतली होती आणि शेवटपर्यंत एकही फलंदाज त्याला मागे टाकू शकला नाही. मात्र यावेळीही तो आपल्या संघाला ट्रॉफीपर्यंत नेऊ शकला नाही. या सगळ्या दरम्यान चेन्नई सुपर किंग्सचा आणि भारतीय संघाचा माजी फलंदाज अंबाती रायुडूने असेच आणखी एक मोठे विधान केले आहे जे खूप व्हायरल होत आहे. या हंगामात रायडू आरसीबीला सातत्याने कोंडीत पकडत आहे.

IPL 2024 Prize Money : नुसता पैशांचा पाऊस! विजेत्या, उपविजेत्यासह ४ संघ मालामाल, ऑरेंज- पर्पल कॅप; कोणाला किती रुपये मिळाले?


आयपीएल 2024 च्या फायनलनंतर अंबाती रायुडूने कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंचे कौतुक केले, त्यादरम्बान त्याने अरिज कॅप जिंकणाऱ्या विराट कोहलीलाही टोमने मारले. अंबाती रायुडू म्हणाला की, अरिंज कॅपने आयपीएल ट्रॉफी जिंकली जात नाही. ट्रॉफी जिंकण्यासाठी संघाचे सहकार्य आवश्यक आहे.

रायुडू म्हणाला की, कोलकातामध्ये मिचेल स्टार्क, आआंद्रे रसेल आणि सुनील नरेन या सर्वांनी योगदान दिले आहे हे आपण पाहू शकतो, त्यानंतर केकेआर ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला आहे. ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्व खेळाडूना थोडेफार योगदान द्यावे लागेल. अंरिज कॅप जिंकणारा खेळाडू कोणतीही ट्रॉफी जिंकत नाही. अंबाती रायडूच्या या विधानाला चाहते आता विराट कोहलीशी जोडत आहेत.

विराट कोहलीने यदाच्या आयपीएलमध्ये 15 सामने खेळले. या काळात विराटने 61.75 च्या सरासरीने 741 थावा केल्या. या मोसमात त्याच्या बॅटमधून 5 अर्धशतके आणि 1 शतक झळकले. विशेष बाब म्हणजे विराट कोहलीने 154.69 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या, ज्यात 62 चौकार आणि 38 षटकारांचा समावेश होता. या हंगामात सर्वाधिक अर्धशतके झळकावणाऱ्याऱ्यांमध्ये विराट कोहली संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. त्याचा संघ प्लेऑफमध्येही पोहोचला होता, पण एलिमिनेटर सामना गमावून या मोसमातून बाहेर पडला होता.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply