Virar Accident : ट्रकखाली ३ जण चिरडले; एकाचा जागीच मृत्यू, पती–पत्‍नी गंभीर जखमी

विरार : विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथील नारंगी फाटक रस्त्यावर एक हायवा ट्रक रस्त्यातच उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकखाली तीन जण सापडल्याची माहिती समोर येत असून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. 

विरार नारिंगी फाटकापासून ग्लोबल सिटीच्या दिशेने हा ट्रक जातं होता. मात्र भरधाव वेगात विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका टेम्पोला वाचविण्याच्या नादात ट्रकचा टायर खड्ड्यात गेला. यामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्याकडेला उलटला. याच दरम्यान समांतर दिशेने जाणारे दुचाकीवरील तिघे जण ट्रकखाली सापडल्याने चिरडले गेले.

पती– पत्‍नी गंभीर

घटनेची माहिती अर्नाळा पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक व अग्निशमन पथकाच्या जवानांच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु केले आहे. हा ट्रक मालाने भरलेला असल्याने तीन क्रेनच्या साहाय्याने हा ट्रक बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. याअपघातात पती पत्नी गंभीर जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *