Vijaystambh Sohala : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

पुणे - कोरेगाव भीमा जवळील पेरणे फाटा येथील विजयस्तंभ अभिवादनासाठी रविवारी (ता.1) येणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. पुणे पोलिस दलातील सहा हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी, अधिकारी, राज्य राखीव पोलिस दल, शीघ्र कृती दलाच्या पथकांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याबरोबरच स्पॉटर किट व्हॅन, व्हिडीओ कॅमेरा व ड्रोन कॅमेऱ्याद्वारे "वॉच' ठेवला जाणार आहे.

विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी मोठ्या संख्येने अनुयायी येतात. तीन वर्षांपासून विजयस्तंभाच्या सुरक्षिततेवर प्रशासनाकडून गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. त्यादृष्टीने यावर्षीही पुणे शहर पोलिस, ग्रामीण पोलिस दलाकडून विजयस्तंभाच्या ठिकाणी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या सुरक्षिततेवर भर देण्यात आला आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदिप कर्णिक यांच्याकडून मागील काही दिवसांपासून सातत्याने बैठका घेऊन बंदोबस्त व सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजना यावर भर देण्यात आला होता.

विजयस्तंभाच्या ठिकाणी सातत्याने भेटी देऊन मार्गदर्शन व आवश्‍यक सुचनाही त्यांच्याकडून देण्यात आल्या होत्या. रितेश कुमार व कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली विजयस्तंभ अभिवादन बंदोबस्ताची रंगीत तालीम नुकतीच घेण्यात आली. दरम्यान, विजयस्तंभ परिसरात गोपनीय यंत्रणाही सतर्क करण्यात आली आहे. नागरीकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह मजकुर समाजमाध्यमांवर प्रसारीत करु नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. विजयस्तंभ परिसरात कोणीही हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सुचना पोलिसांनी दिलेल्या आहेत.

अशी आहे सुरक्षिततेची सद्यस्थिती

- सीसीटीव्ही कॅमेरे - 240

- स्पॉटर किट व्हॅन - 05

- व्हिडीओ कॅमेरा

- ड्रोन कॅमेरा

पोलिस बंदोबस्त

- अतिरीक्त पोलिस आयुक्त - 04

- पोलिस उपायुक्त - 15

- सहाय्यक पोलिस उपायुक्त - 21

- पोलिस निरीक्षक - 90

- सहाय्यक पोलिस निरीक्षक - 250

- पोलिस कर्मचारी - 4 हजार

- गृहरक्षक दल - 1 हजार

- बीडीडीएस पथके - 11

- क्‍युआरटी पथके - 6

- आरसीपी स्ट्रायकींग - 05

- एसआरपीएफ - 8 कंपनी

आक्षेपार्ह माहिती मिळाल्यास इथे साधा संपर्क

- 02026126296

- व्हॉटसअप क्रमांक 8975953100

- पोलिस नियंत्रण कक्ष - 112



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply