Vidhansabha Election 2024 : राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा, २ उमेदवार जाहीर, उद्धव ठाकरेंच्या विश्वासू आमदाराविरोधात नांदगावकर मैदानात!

Vidhansabha Election 2024  : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून २ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. बाळा नांदगांवकर यांना शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघामधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी २ विधानसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.

राज ठाकरे यांनी'एकला चलो रे'चा नारा दिल्यानंतर २२५ उमेदवारांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान सोलापूरमध्ये त्यांनी विधानसभेसाठीच्या २ अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यांनी शिवडीमधून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली. बाळा नांदगावकर हे मनसेचे माजी आमदार आणि गृहराज्यमंत्री देखील होते. तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिलीप धोत्रे हे मनसेचे जुने आणि जाणकार नेते आहेत.

Mumbai : भयंकर! सोसायटी मिटिंगमध्ये तुफान राडा, अध्यक्षाने सभासदाचा अंगठा चावून तोडला

मनसेकडून अधिकृत परिपत्रक जाहीर करत २ उमेदवारांची नावं जाहीर केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच डोकेदुखी वाढणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी पीएम मोदी आणि महायुतीला पाठिंबा दिला होता. ते महायुतीच्या अनेक सभांमध्ये दिसले. त्यांनी प्रचार देखील केला होता. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी ते गेले होते. आता लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे स्वबळावर लढणार असल्यामुले महायुतीलायाचा फटका बसू शकतो.

दरम्यान, मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांना पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून आज उमेदवारी जाहीर करण्यात आली. मनसेचे नेते राज ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान राज ठाकरे यांनी दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली. श्री धोत्रे हे विद्यार्थी सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत काम करत आहेत. धोत्रे यांनी पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्यात संघटनेचे काम वाढवले आहे. अलीकडेच दिलीप धोत्रे यांच्याकडे सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी धोत्रे यांनी २००४ साली मनसेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply