Vibhakar Shastri : काँग्रेसला आणखी एक धक्का, लाल बहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

Vibhakar Shastri : काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. लखनौमध्ये माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्या उपस्थितीत विभाकर शास्त्री यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विभाकर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

विभाकर शास्त्री म्हणाले की, मला वाटते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लाल बहादूर शास्त्री यांच्या ‘जय जवान, जय किसान’ या संकल्पनेला अधिक बळ देऊन देशाची सेवा करू शकेन. 

Hingoli News : कत्तलीसाठी बैलांना कोंबून नेणारा ट्रक पोलिसांनी केला जप्त

विभाकर शास्त्री म्हणाले की, ''भाजपचे माझ्यासाठी दरवाजे उघडल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, अमित शाह मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि ब्रजेश पाठक यांचे आभार मानू इच्छितो. पक्षनेतृत्वाच्या सूचनेनुसार मी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. इंडिया आघाडीची कोणतीही विचारधारा नाही, तर मोदींना हटवणे हाच त्यांचा उद्देश आहे. काँग्रेसची विचारधारा काय आहे हे राहुल गांधी यांनी सांगावं.'' 

याआधी, विभाकर शास्त्री यांनी बुधवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी ट्विटवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे याना एक पोस्ट टॅग करत आपला राजीनामा जाहीर केला. यात विभाकर शास्त्री म्हणाले, "आदरणीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जी, मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.'' विभाकर शास्त्री हे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव राहिले आहेत.

दरम्यान, याआधी महाराष्ट्रात ही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजपने त्यांना राज्यसभेवर संधी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply