
Vegetable Prices : राज्यात पावसाने धडक एण्ट्री केली. चार दिवसांपूर्वी पावसाने जोरदार बँटींग केली, यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाली आहे. अनेकांचं काही प्रमाणात नुकसानही झालंय. आता याचा थेट फटका शेतकऱ्यांनाही बसतो आहे. आधीच अवकाळी पावसामुळे काही भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. अशातच चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा थेट परिणाम भाजीपाला बाजारावर झाला आहे.
पाण्याने नुकसान झाल्यामुळे भाज्यांची आवक घटली आहे. साधारणतः एपीएमसी मार्केटमध्ये दररोज येणाऱ्या ७०० गाड्यांची संख्या आता फक्त ४३७ वर आली आहे. त्यामुळे पुरवठा कमी झाल्याने भाजीपाला दर दुप्पट वाढले आहेत. याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला होतो. याशिवाय बाजारात आलेला भाजीपाला पावसामुळे भिजल्याने लवकर खराब होत आहे. परिणामी खरेदीदार त्रस्त झाले असून, विक्रेत्यांनाही तोटा सहन करावा लागत आहे.
किरकोळ बाजारातील भाजीपाला दर (प्रति किलो)
भाजीपाला किंमत
शेवगा 150 – 160
शिमला मिरची 100 – 110
फ्लॉवर 120 – 130
गवार 120 – 130
टोमॅटो 50 – 60
वांगी 60 – 70
गाजर 60 – 70
काकडी 60 – 70
भेंडी 80 – 90
कारली 80 – 90
पालेभाज्यांचा जुडी दर
कोथिंबीर – ₹50
मेथी – ₹50
पालक – ₹50
|
Pandharpur Wari : पंढरपुरच्या वारीच्या मार्गात VIP ताफ्यांना नो एन्ट्री; सरकारचा निर्णय |
भाजीपाल्याची वाढती दरवाढ सामान्य ग्राहकांच्या खिशावर भार टाकत आहे. पुरवठा सुरळीत होईपर्यंत दर काही दिवस असेच राहण्याची शक्यता आहे.
अकोल्यात ज्वारी पिकाचे मोठे नुकसान
मान्सूनपूर्व पावसाने अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. विशेषतः ज्वारी पिकावर या पावसाचा जबरदस्त परिणाम झाला असून, हाता तोंडाशी आलेला घास अक्षरशः हिरावून नेला आहे. काळवंडलेल्या ज्वारीच्या कणसांना पावसामुळे कोंब फुटले असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
हिंगणी गावातील युवा शेतकरी तुषार कोरडे यांचे ज्वारीचे पीक पूर्णतः खराब झाले आहे. त्यांनी मेहनतीने वाढवलेले पीक अवकाळी पावसामुळे मातीमोल झाले असून, त्यांच्या श्रमावर पाणी फिरले आहे. अशा प्रकारे तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

