Vastu Shastra : स्वयंपाक घरात चुकूनही ठेवू नका या चार गोष्टी, घरात कधीच टिकणार नाही पैसा

वास्तुशास्त्रानुसार घरात जेव्हा नकारात्मक शक्ती निर्माण होते, तेव्हा तुम्हाला अचानक महत्त्वाच्या कामात अडचणी येऊ लागतात. घरात पैसा टिकत नाही, काहीही कारण नसताना कुटुंबातील सदस्यांसोबत भांडणं होतात, यालाच आपण सोप्या भाषेमध्ये वास्तुदोष देखील म्हणतो. त्यामुळे अशाप्रकारच्या नकारत्मक ऊर्जेला अटकाव करणं गरजेचं असतं. तुमच्या घरातील सर्वात महत्त्वाची जागा कोणती असेल तर ती म्हणजे तुमच्या घरातील स्वयंपाक घर. कारण स्वयंपाक घर हे अशी जागा असते, जिथे तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी स्वयंपाक तयार करता. तुम्ही जे अन्न तयार करता, त्याच्यामाध्यमातून विविध प्रकारची ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करत असते, तसेच तुमच्या घरात देखील या ऊर्जेचे संचार होतो. अशा काही गोष्टी असतात त्या जर तुमच्या स्वयंपाक घरात असतील तर त्याचा नकारात्मक परिणाम होतो, घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

शिळं अन्न – वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही शिळं अन्न पडू देऊ नये, जर काही अन्न जेवणानंतर उरणार असेल तर ते गरजू लोकांना दान करावं किंवा गायीला खाऊ घालावं, जर तुमच्या घरात वारंवार शिळं अन्न उरत असेल तर त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे कधीही अन्नाचा अपमान करू नका, असं वास्तुशास्त्र सांगंतं.

तुटलेली भांडी – वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही तुटलेली भांडी ठेवू नयेत, जर तुमच्या स्वयंपाक घरात तुटलेली, तडा गेलेली किंवा चिर पडलेली भांडी असतील तर ती आजच घरातून दूर करा. कारण अशा भांड्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वास्तुदोष निर्माण होतो. घरात आर्थिक स्थिरता राहत नाही. तुम्ही कितीही कमावलं तरी पैसा तुमच्या हातात राहत नाही, त्यामुळे अशी भांडी कधीही स्वयंपाक घरात ठेवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.

कचरा – जेव्हा तुम्ही तुमचं स्वयंपाक घर स्वच्छ करता, किंवा झाडता, तेव्हा तिथला कचरा तिथेच गोळा करून ठेवू नका, स्वयंपाक घरात कधीही कचरा असू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं. स्वयंपाक घर स्वच्छ केल्यानंतर कचरा गोळा करून तो लगेच घराच्या बाहेर टाकावा. त्यामुळे तुमच्यावर कायम लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो.

खरकटी भांडी – स्वयंपाक झाला किंवा तुम्ही जेवण केलं की स्वयपांक घरातील भांडी लगेच स्वच्छ करा, ती खरकटी भांडी तशीच स्वयंपाक घरात तशीच ठेवू नका, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *