Vasai Crime News: वसईतुन ३ अल्पवयीन मुली अचानक झाल्या बेपत्ता

वसई: वसई पश्चिम परिसरातून तीन अल्पवयीन मुली राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाल्या आहेत. या तिघींमध्ये दोन सख्या बहिणींसह एका मोलकरिणीचा समावेश आहे. याबाबत माणिकपूर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. मुलींच्या तपासासाठी वेगवेगळी चार पोलिस पथके रवाना झाली आहेत.

वसईच्या माणिकपूरमधील एका कुटुंबातील दोन मुली आणि घरात काम करणारी एक तरुणी अशा तिघी आज (ता. ३) पहाटेच्या सुमारास घरातून बेपत्ता झाल्या आहेत. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुलींची आई त्यांना शाळेत जाण्यासाठी उठवण्यासाठी त्यांच्या रुममध्ये गेली असता मोलकरीण आणि दोन सख्या बहिणी आढळल्या नाहीत.

त्यांनी इतरत्र शोधाशोध केली, पण त्या तिघीही सापडल्या नाहीत. या प्रकरणी कुटुंबीयांनी माणिकपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ वेगवेगळी पथके बनवून मुलींच्या तपासासाठी रवाना केली आहेत, अशी माहिती वसईच्या सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बडे यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply