Varandha Ghat Accident: वरंधा घाटात गाडी पलटी; प्रवाशी थोडक्यात बचावले

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाटात चर्चाही वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाल्याची घटना घडली. हि गाडी घाटातून खाली गेली असती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. यामुळे सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

पुणे जिल्ह्यातील भोरमार्गे महाडच्या दिशेने जात असताना वरंधा घाटातून गाडी जाताना वारवंड गावाच्या हद्दीत रस्त्याचा अंदाज न आल्याने चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेच्या चारित जाऊन पलटी झाल्याने अपघात झाल्याची घटना घडली. या गाडीत काही प्रवाशी होते. या गाडीतले २ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. या दोघांना किरकोळ दुखापत झाली. मात्र यामध्ये चारचाकी गाडीचे मोठं नुकसान झाले आहे. 

MNS On Marathi Patya : मुंबईत मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक; दोन दिवसात मराठी फलक लावा अन्यथा खळखट्याक करण्याचा इशारा

घाट रास्ता तरी कठडे नाही 

येथे घाट रस्ता असून देखील रस्त्याच्या कडेला संरक्षण कठडे नाही. तसेच काही ठिकाणी साईडपट्टी अरुंद असल्याने रस्त्याचा अंदाज येत नसल्यानं ह्या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करतयं , त्यामुळं स्थानिकांनी नाराजी व्यक्त केलीय.  



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply