Valentine : व्हॅलेंटाईन साजरा करायला प्रेयसीच्या घरी गेला, कुटुंबानं हात-पाय बांधून बेदम चोपलं, तरूणाचा मृत्यू

Valentine : व्हॅलेंटाईन वीकला प्रेयसीला भेटायला गेलेल्या एका तरूण प्रियकराची हत्या करण्यात आली आहे. मारहाण करत तरूणाची हत्या त्याच्या प्रेयसीच्या कुटुंबाने केली आहे. ही धक्कादायक घटना ग्वाल्हेरच्या भितरवार भागात घडली आहे. व्हॅलेंटाईन वीक दरम्यान, प्रियकर प्रेयसीच्या घरात गेला होता. तेव्हा प्रेयसीच्या कुटुंबातील सदस्यांनी बेदम मारहाण केली. यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

गजेंद्र बघेल हा तरूण शिवपुरी जिल्ह्यातील त्याच्या बहिणीच्या घरी आला होता. दरम्यान, रविवारी मध्यरात्री त्याच्या प्रेयसीच्या घरी भेटायला गेला होता. मुलीच्या कुटुंबियांनी त्याला पाहिले त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. नंतर प्रेयसीच्या शेजारी राहणारा प्रियकराचा मेहुणा भरत बघेल त्या ठिकाणी पोहोचला. मेहुण्याने गजेंद्रला पाहिले. प्रेयसीच्या कुटुंबाने त्याचे हात - पाय बांधले होते. तसेच त्याला बेदम मारहाण करण्यात आली होती.

Mumbai GBS : मुंबईत GBSने घेतला पहिला बळी, नायर रुग्णालयात उपचारादरम्यान ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मेहुण्याने गजेंद्रला ग्वाल्हेर रूग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रियकर गजेंद्र बघेलच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबाने प्रेयसीच्या तीन सदस्यांवर हत्येचा आरोप केला आहे. पोलिसांनी तरूणाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबाकडे सोपवले आहे.

भितरवारचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र नागौच म्हणतात, या संपूर्ण घटनेबद्दल कुणीही उघडपणे बोलत नाही आहे. तरूण आणि त्याची प्रेयसी दोन्हीही बघेल समाजाचे आहेत. मृत तरूणाच्या कुटुंबाने अद्याप भितरवार पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.

असे म्हटले जाते की, प्रेयसीच्या कुटुंबाला प्रेमसंबंधाची आधीच माहिती होती. परंतू तरूणाला रंगेहाथ पकडण्यात आले आणि त्याला मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply