Vaishnavi Hagawane : हगवणेंचा आणखी एक पराक्रम, JSB जप्त करण्यासाठी आपले कर्मचारी पाठवले, बँक मॅनेजर म्हणाले..

Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर हगवणे कुटुंबाचे नवनवीन प्रताप समोर येत आहेत. अशातच जेसीबी प्रकरणात हगवणे माय लेकाचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण पोलीस तपासात शशांक आणि लता हगवणे यांनी जेसीबी मशीनची बेकायदेशीर ताबा घेण्यासाठी तोतया बँक अधिकारी पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी इंडसइंड बँकेतील मॅनेजरनेही धक्कदायक माहिती दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी तपास करीत ३ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

प्रशांत येळवंडे यांनी लता आणि शशांक हगवणे यांच्याकडून २४ लाख रुपयांना जेसीबी मशीन खरेदी केली होती. मात्र व्यवहार पूर्ण झाल्यानंतरही, हगवणे कुटुंबीयांनी बनावट रिकव्हरी कारवाईचा बनाव करत, मशीन बळजबरीने परत घेतलं. या प्रकरणी हगवणे कुटुंबाने इंडसइंड बँकेच्या नावाखाली ३ तोतया कर्मचारी पाठवले. तसेच येळवंडेकडून जेसीबी मशीन जप्त केली.

या प्रकरणात प्रशांत येळवंडे यांच्या तक्रारीवरून लता हगवणे आणि शशांक हगवणे यांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आधीच अटक केली आहे. पोलिसांनी अधिक तपास करून योगेश राजेंद्र रासकर (वय 25), गणेश रमेश पोतले (वय 30) आणि वैभव मोहन पिंगळे (वय 27) या तीन तोतया बँक कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

इंडसइंड बँकेचा खुलासा

या प्रकरणात इंडसइंड बँकेच्या लीगल मॅनेजरने स्पष्ट केलं की, बँकेने कुठल्याही रिकव्हरी एजन्सीला जेसीबी जप्त करण्याचे आदेश दिले नव्हते. त्यामुळे हा सर्व प्रकार फसवणुकीचा होता हे स्पष्ट झालं आहे.

गोडाऊन मालकांची कबुली

जेसीबी नेहमी ठेवण्यात येणाऱ्या गोडाऊनचे मालक रणजित आणि भूषण खांडेभराड यांनी देखील तपासात सांगितलं की, येळवंडे यांच्याकडून जप्त झालेला जेसीबी कधीच त्यांच्या गोडाऊनमध्ये आला नव्हता. त्यामुळे जेसीबी जप्ती हा हगवणे मायलेकांच्या कटाचा भाग असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply