Vaishali Darekar : लढणार आणि जिंकणार; श्रीकांत शिंदेंविरोधात उमेदवारी मिळाल्यानंतर वैशाली दरेकरांनी व्यक्त केला विश्वास

Vaishali Darekar : समोर कितीही तगडा उमेदवार असला तरी मी लढणार आणि जिंकणारच असा विश्वास वैशाली दरेकर यांनी व्यक्त केला आहे.लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी वैशाली दरेकरांना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी मिळाल्यावर त्यांनी अशा शब्दांत विश्वास व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा कल्याण लोकसभा मतदारसंघ अधिक चर्चेत असणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची चर्चा असून उमेदवारी जवळपास निश्चित आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही तर ठाकरे गटाकडून अनेक दिग्गजांची नावे चर्चेत होती.

Nagpur Lok Sabha : निवडणूक प्रचारात शालेय विद्यार्थ्यांचा वापर, नितीन गडकरींविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मात्र कल्याण लोकसभा मतदारसंघ कुणाला मिळणार याचा सस्पेन्स आज सुटलाय. शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. वैशाली दरेकर या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या खंद्या समर्थक आहेत. वैशाली दरेकर यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेमधूनच झाली होती.

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वैशाली दरेकर या राज ठाकरे यांच्यासोबत मनसेमध्ये गेल्या. 2009 मध्ये त्यांनी मनसेमधून लोकसभा निवडणूक देखील लढवली. त्यानंतरच्या काळात त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी ठाकरे गटासोबतच राहणे पसंत केले. वैशाली दरेकर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक संघटनात्मक पदे विरोधी पक्षनेता पद देखील भूषवले. विरोधी पक्षनेता असताना त्यांनी सभागृह दणाणून सोडले होते.

वैशाली दरेकर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी समोर कितीही तगडं आव्हान असलं तरी लढणार आणि निवडून येणार असा विश्वास व्यक्त केलाय.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply