Vaijapur Bandh : उपजिल्हाधिका-यांवरील कारवाईसाठी वैजापूरात कडकडीत बंद

Vaijapur Bandh : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरात पतंग उडवणाऱ्या मुलांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शहरात आज (बुधवार) सर्व पक्ष नेत्यांकडून कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले हाेते. त्यास वैजापूरच्या नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. 

वैजापूर शहरात नायलाॅन मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी साेमवारी उपजिल्हाधिकारी अरुण जराड हे गेले होते . ज्या ठिकाणी मांजा उपलब्ध नव्हता त्या ठिकाणी असलेल्या काही तरुणांना मारहाण केल्याचा आरोप वैजापूर शहरातील नागरिकांनी जराड यांच्यावर केला.

Pune Crime : पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यात वेश्याव्यवसाय करणाऱ्या अभिनेत्रीसह २ रशियन मॉडेल ताब्यात, परदेशातील कनेक्शन उघड

त्यानंतर शहरातील नागरिकांचा मोठा जमाव पोलीस ठाण्यामध्ये जमला. उपजिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. त्याच वेळेस उपजिल्हाधिकारी तिथे दाखल झाल्यानंतर त्यांना देखील मारहाण आणि धक्काबुक्की करण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान त्यावेळेस कोणताही गुन्हा केला नसून वैजापूर शहरातील नागरिकांनी माझ्यावर आराेप केला आहे असे जराड यांनी नमूद केले.

दरम्यान उपजिल्हाधिकारी जराड यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करत आज (बुधवार) वैजापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply