Vadar Samaj Morcha : सरकारने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार : महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ

Sangli News : वडार समाजाच्यावतीने विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये आज (साेमवार) जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात धडक मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र राज्य वडार संघाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील वडार समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. 

राज्यातल्या दुर्लक्षित असलेल्या वडार समाजाच्या विद्यार्थ्यांना, व्यक्तींना जातीचा दाखला आणि जात पडताळणी बाबत असणाऱ्या जाचक अटी मधून वडार समाजाला सवलत मिळावी यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी वडार समाजाच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

Andheri Landslide : अंधेरी पूर्वेतील चकाला परिसरात दरड कोसळली; ४ ते ५ घरांवर मातीचा ढिगारा, बचावकार्य सुरू

राज्य सरकारने भटका विमुक्त असणाऱ्या वडार समाजाच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावं अन्यथा या पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा समस्त वडार समाजाकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद पवार व सांगली जिल्हाध्यक्ष विनायक कलगुटगी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply