Uttar Pradesh Hathras: हाथरसमधील भोले बाबांच्या सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी; ५० ते ६० जणांचा मृत्यू, मृतांमध्ये २५ महिलांचा समावेश

Uttar Pradesh Hathras : उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झालीय. रितभानपूर गावात भोले बाबा यांच्या सत्संगाचा कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. माहिती एटाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी उमेश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत ५० ते ६० जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीअपघाताची दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत. ADG आग्रा आणि अलिगडच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तपास पथक तयार करण्यात आले आहे. ठार झालेल्यांमध्ये २५ महिला असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस दल आणि प्रशासनाचे अधिकारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. जखमी महिला, मुले आणि पुरुषांना बेशुद्ध अवस्थेत एटा, अलीगड, सिकंदरराव रुग्णालयात नेण्यात आलंय. हाती आलेल्या माहितीनुसार, सत्संगाच्या मंडपात प्रचंड उकाडा जाणावत होता आणि आर्द्रतेमुळे चेंगराचेंगरी झाली. दरम्यान पोलीस प्रशासन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी उशिरा पोहोचलीय.

Hathras Stampede : हाथरसमधील चेंगराचेंगरीत १०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; स्थानिक गुप्तचर युनिटनं आधीच वर्तवली होती भीती,PM मोदींकडून शोक व्यक्त

लखनऊमधील कोणत्याही प्रमुख जबाबदार अधिकाऱ्याने अद्याप कोणतीही अपडेट दिलेली नसली तरी मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, २७ लोकांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केलाय. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्यात. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात.

तसेच जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आयोजन मंडळासह स्थानिक प्रशासनावर कारवाई करण्यात यावं असं सांगण्यात यावं. या संपूर्ण घटनेचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडून मागवण्यात आलाय. चेंगराचेंगरीला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

आधी एटाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी उमेश त्रिपाठी यांनी २७ जणांचा मृूत्यू झाल्याची माहिती दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदराऊ कोतवाली येथील एका गावात भोलेबाबा यांचं प्रवचन होतं. या कार्यक्रमासाठी साधारण २० हजार भाविक आले होते. या गर्दीमुळे भाविक त्रासले होते. गर्दी आणि उन्हामुळे लोक बेहोश होऊन खाली पडले, हे पाहून लोकं घाबरले आणि मंडपाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. त्याचदरम्यान चेंगराचेंगरी झाली. जेव्हा लोक जमिनीवर पडले तेव्हा इतर लोक त्यांना चिरडून पुढे जात होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाने शेकडो गंभीर लोकांना रुग्णालयात दाखल केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply