USA vs PAK : युएसएने पाकिस्तानचा निम्मा संघ शंभरच्या आत गुंडाळला; आफ्रिदीनं पार करून दिला 150 धावांचा टप्पा

USA vs PAK T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्डकप 2024 च्या ग्रुप A मधील पाकिस्तान विरुद्ध युएसए सामन्यात पाकिस्तानचा अवस्था बिकट झाली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना युएसएने पाकिस्तानची अवस्था 5 बाद 98 धावा अशी केली. नीशतुश केंजीगे चांगला मारा करत पाकिस्तानच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांच्या हिट लिस्टवर असलेला आझम खान आजच्या सामन्यात भोपळाही फोडू शकला नाही.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या युएसएने पॉवर प्लेमध्येच पाकिस्तानला तीन तगडे धक्के दिले. नेत्रावळकरने मोहम्मद रिझवानला 9 धावांवर बाद केलं. त्यानंतर नोशतुश केजीगे उस्मान खानची तीन धावांवर शिकार केली. पाठापाठ फखर झमान देखील 11 धावांची भर घालून माघारी परतला. पाकिस्तानची अवस्था 3 बाद 26 धावा अशी झाली होती.

Hardik Pandya : हार्दिक पंड्याचा मोठा कारनामा! पहिल्याच सामन्यात मोडून काढला युवराज सिंगचा रेकॉर्ड

त्यानंतर मात्र कर्णधार बाबर आझम शादाब खान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघानी चौथ्या विकेटसाठी

72 धावांची भागीदारी रचली. शादाब खान अर्धशतकाच्या जवळ पोहचला असताना नोशतुशने पाकिस्तानला मोठा धक्का दिला. त्याने शादाबला 40 धावांवर बाद केल.

त्यानंतर आलेल्या आझम खानला नोशतुशने भोपळाही फोडू दिला नाही. पाकिस्तानची अवस्था 3 बाद 98 धावापासून 5 बाद 98 धावा अशी झाली.
पाकिस्तानचा निम्मा संघ गारद झाल्यानंतर बाबर आझम आणि इफ्तिकार अहमदने डाव सावरत संघाला 139 धावांपर्यंत पोहचवलं. त्यानंतर शाहीन आफ्रिदी आणि हारिसने पाकिस्तानला रडत खडत का होईना 150 धावांच्या जवळ पोहचवलं.

आफ्रिदीने 16 चेंडूत 23 धावा केल्या त्यामुळे पाकिस्तान 20 षटकात 7 बाद 159 धावांपर्यंत पोहचू शकला. युएसएकडून नोशतुशने 3 तर सौरभ नेत्रावळकरने 2 विकेट्स घेतल्या.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply