Urmila Kothare Car Accident : अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारला अपघात, मजुरांना चिरडलं; एकाचा मृत्यू; कारचा चक्काचूर

Mumbai : राज्यासहित मुंबईतही अपघाताचं सत्र सुरुच आहे. कुर्ला बेस्ट अपघात आणि घाटकोपर टेम्पो अपघाताची घटना ताजी असताना शुक्रवारी रात्री देखील कांदिवलीत अपघाताची घटना उघडकीस आली आहे. कांदिवलीत मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरात ही घटना घडली आहे. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या अपघातात उर्मिला आणि तिचा कार चालक देखील अपघात झाला आहे.

ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांची सून, अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारला भीषण अपघात झाला आहे. शूटिंग संपवून घरी परतत असताना उर्मिला कोठाराच्या कारने दोन मजुरांना उडवल्याची माहिती हाती आहे. मेट्रो प्रकल्पावर काम करणारे हे दोन मजूर असल्याचे प्राथमिक माहिती आहे. या अपघातामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात उर्मिला आणि तिचा कार चालकही अपघातात जखमी झाल्याची माहिती आहे.

Pune : पोलीस महासंचालकांकडून विजयस्तंभ अभिवादन सोहळा बंदोबस्ताचा आढावा; पोलीस आयुक्तालयात बैठक

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कांदिवलीतील पोयसर मेट्रो सस्थानकजवळ ही घटना घडली. मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांना उर्मिला कोठारे यांच्या भरधाव कारने धडक दिली. कारच्या जोरदार धडकेत एका मजुराचा जागेवरच मृत्यू झाला. तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. अभिनेत्री उर्मिला शुक्रवारी रात्री तिचे शूटिंग संपवून कारमधून घरी जात होती. वेग जास्त असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना धडक दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात कारचा चालक आणि अभिनेत्री उर्मिलाही गंभीर जखमी झाली आहे. कारची एअर बॅग योग्य वेळी उघडल्याने अभिनेत्रीचा जीव वाचला. या अपघातात तिच्या कारचा मात्र चक्काचूर झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. उर्मिलाच्या कारने उडवलेलेले दोन्ही मजूर हे मेट्रोमध्ये काम करणारे होते, अशी माहिती समोर आलेली आहे. मुंबईतील समतानगर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply