Uran Bike Accident: कामावरून घरी परतताना काळाचा घाला; अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, २ जणांचा मृत्यू

Uran Bike Accident : उरण- पनवेल मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात झाला असून यात दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय. कामावरून घरी जाणाऱ्या दोन तरुणांवर काळाने घाला घातलाय. दुचाकीचा हा अपघात उरणमधील जासई उड्डाणपुलावर झाला. यात दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिलीय.

अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याननंतर वाहन चालक फरार झाल्याची माहिती स्थानिकांनी दिलीय. या अपघाताप्रकरणी उरण पोलीस अपघात कसा झाला याबद्दल अधिक तपास करत आहेत. अभिजित भुवड आणि अनिश नायर अशी अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. उरण पनवेल मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. आज उरणमधील जासई उड्डाणपुलावर दुचाकीचा भीषण अपघात झाला.

या अपघातात मोटरसायकल वरील दोन तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. उरणमधील बोरी गावातील अभिजित भुवड ( वय 30) आणि अनिश नायर (वय 26) तरुण कामावरून आपल्या घरी जात होते. यावेळी उरण पनवेल मार्गावरील जासई उड्डाणंपुलावर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झालाय. त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिलीय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply