UP Lok Sabha : वरून गांधींना तिकीट देणार अखिलेश यादव? मायावतींशी युतीबाबत सपा अध्यक्षांनी केलं मोठं वक्तव्य

UP Lok Sabha : देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. सात टप्प्यांत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत. सर्वच पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. दरम्यान, भाजप वरुण गांधींना पिलीभीतमधून तिकीट देणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या जागी भाजपच्या वतीने जितिन प्रसाद किंवा संजय गंगवार यांना मैदानात उतरवले जाऊ शकते.

यातच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी वरुण गांधींबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. वरुण गांधी यांच्याबाबत सॉफ्ट कॉर्नर असल्याचं त्यांनी म्हटले आहे. यासोबतच त्यांनी बसपा प्रमुख मायावती यांच्यासोबत युतीबाबतही महत्वाची माहिती दिली आहे. 

Arvind Kejriwal : दिल्ली सरकार तुरुंगातून चालणार! CM अरविंद केजरीवाल यांचा 'ईडी कोठडी'तून पहिला आदेश जारी

"यावर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. वरुण यांच्यासाठी आमची दारे उघडी नाही, मात्र सॉफ्ट कॉर्नर आहे. भाजपचे लोक आमच्या उमेदवार त्यांच्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांचा उमेदवार चांगला असेल तर, आम्ही वरून यांच्याबद्दल विचार करू.''  

अखिलेश यादव म्हणाले, ''इंडिया आघाडी लवकरच समान किमान कार्यक्रमची घोषणा करणार. तसेच सपा व्हिजन डॉक्युमेंट लवकरच प्रसिद्ध केला जाईल. यामध्ये शेतकऱ्यांना कसा दिलासा दिला जाणार, हे सांगण्यात येणार आहे. आमच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये उत्तर प्रदेशसह देशातील शेतकऱ्यांची कर्जे माफ केली जावीत, हे आमच्या समान किमान कार्यक्रमात समाविष्ट केले जाईल.''

'आता खूप उशीर झाला आहे'

इंडिया आघाडीचे मायावतींसाठी दरवाजे उघडे आहेत का? असा प्रश्न त्यांना विचारला असता अखिलेश यादव म्हणाले की, ''आता निवडणुकीची तारीख आली आहे. आता युतीवर काय चर्चा करायची? होळीचा सण नसता तर नामांकने झाली असती. आता खूप उशीर झाला आहे.''



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply