Unseasonal Rain In Yavatmal : यवतमाळला अवकाळीचा आजही तडाखा, पूरस्थितीने जनजीवन विस्कळीत

Unseasonal Rain In Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यात आजही (मंगळवार) अवकाळी पावसाचा जाेर आहे. अवकाळी पावसामुळे शेतक-याचे अतोनात नुकसान हाेऊ लागले आहे. पावसाच्या पाण्यामुळे पुसद तालुक्यातील पार्डी येथील नाल्याला पूर आला आहे. त्यामुळे दोन्ही बाजुच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी अवकाळी पाऊस पडू लागला आहे. साेमवारी झालेल्या पावसामुळे खरिपातील पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची आकडेवारी प्रशासनाने जाहीर केलीय. कापूस,तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पावणे चार लाख हेक्टर क्षेत्रातील कापूस भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

NCP Political Crisis : ...म्हणून राष्ट्रवादी पक्ष मूळ आमचाच; अजित पवार गटाचा दावा

त्यातच दुसर्‍या दिवशीही अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे खरिपातील हातातोंडाशी आलेला पीक वाया जाणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

खरिपात काढलेल्या पिक विमा नुकसान झाल्यानंतर मिळाला नाही त्यामुळे रब्बीत शेतकऱ्यांनी आखडता हात घेतला. सलग दोन दिवसापासून अवकाळी पाऊस बरसत असल्याने रब्बीतील पिकांचे देखील नुकसान होणार आहे. हजारो शेतकरी या वर्षी रब्बीतील पीक विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहणार असल्याचे बोलले जात आहे.

पुसद तालुक्यात नाल्याला पूर

यवतमाळ जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पुसद तालुक्यातील पार्डी येथील नाल्याला पूर आल्याने रस्ता बंद झाला. यामुळे दोन्ही बाजुच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या दोन तासांपासून पुरामुळे रस्ता बंद असल्याने दोन्ही बाजुच्या वाहतूक सेवा बंद आहे. या बराेबरच महागाव तालुक्यातील गुंज गावाला देखील नाल्याला पुराने वेढले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply