Unseasonal Rain Hits Buldhana : वीज काेसळून शेगाव, खामगाव तालुक्यातील ३० मेंढ्यांचा मृत्यू

Unseasonal Rain Hits Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातील लाखो शेतकरी व रहिवाशांना रविवारी रात्रभर निसर्गाचे भीषण तांडव अनुभवायला मिळाला. विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, गारांचा वर्षाव यासह मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या तेराही तालुक्यात हजेरी लावत पिकांची नासाडी केली. यामध्ये ३० पेक्षा जास्त मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. अनेक गावांत रात्रीपासून खंडित झालेला वीज पुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही.

रविवारी रात्री पासून सोमवारी पहाटे पर्यंत अवकाळी पावसानं बुलढाणा जिल्ह्यात हजेरी लावली. यामध्ये शेगाव आणि खामगाव तालुक्यातील मेंढपाळांच्या च्या एकूण ३० मेंढ्या दगावल्या आहेत. रात्रीच्या सुमारास गारपीट आणि वीज कोसळल्यानं मेंढ्या दगावल्या आणि अनेक मेंढ्या जखमी झाल्या आहेत. यामुळं मेंढपाळाचं लाखोंचे नुकसान झालं आहे.

Ram Mandir Darshan : राज्यातील १५ लाख भाविकांना श्रीराम दर्शनासाठी अयोध्येत नेणार; चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

खामगाव तालुक्यातील शिराळा शिवारातील सैलानी कृष्णाजी हटकर यांच्या पाड्या वरील वीस मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. शेगाव तालुक्यातील टाकळी विरो येथील शेतात मेंढपाळ कुटुंब संतोष हनुवती हटकर वास्तव्यास आले होते.

रात्रीच्या अवकाळी पावसाने व गारपिटीने त्यांच्या अनेक मेंढ्या दगावल्या. अद्याप पर्यंत पंचनामा झालेला नसून मेंढपाळ बांधवांवरती अस्मानी संकट कोसळले आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या मेंढपाळांनी शासनाच्या मदतीची अपेक्षा केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply