Unseasonal Rain : चांदूरबाजार परिसरात गारपीटसह वादळी वाऱ्याचा पाऊस; गहू, कांद्याचे नुकसान

Unseasonal Rain :  हवामान विभागाने राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  या अंदाजानुसार मागील दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी पाऊस झाला. तर आज सकाळी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात गारपिटीसह वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानुसार ७ एप्रिलपासून राज्यातील काही भागांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण पाहण्यास मिळाले. दरम्यान अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुका परिसरात आज सकाळीच ढगाळ वातावरण होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. यावेळी लिंबूच्या आकाराची गार देखील पडली. अचानक आलेला पाऊस व गारपीट झाल्याने नागरिकांची धावपळ उडाली. 

Dombivali News : डोंबिवलीत बिल्डर लॉबीची गुंडगिरी; रात्रीच्या अंधारात ७ घरांवर फिरवला बुलडोझर

गहू, कांदा संत्र्याचे नुकसानहवामान खात्याने अंदाज वर्तविल्याने शेतकरी चिंतेत होता. यामुळे काढणीला आलेले पीक शेतातून काढण्याच्या प्रयत्नात होता. मात्र  चांदुर बाजार तालुक्यात सकाळीच आलेला पाऊस व गारपिटीमुळे परिसरातील गहू, संत्रा व कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने तालुक्यातील थुगाव व पिंपरीमध्ये गारपीट झाल्याने गहू, कांदा या पिकांचे अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply