Unmesh Patil Join Shivsena UBT : अखेर उन्मेष पाटलांनी बांधलं शिवबंधन! जळगावमध्ये भाजपला ठाकरेचा दणका

Unmesh Patil Join Shivsena UBT : भारतीय जनता पक्षाने तिकीट कापलेले जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी मंगळवारी मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व पाठोपाठ उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांनी आज ‘मातोश्री’वर उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

उन्मेष पाटील यांच्याबरोबर त्यांचे मित्र व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला आहे. लोकसभा उमेदवारीसाठी करण पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तर जळगावमधून उन्मेष पाटलांना ठाकरे गट उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Solapur Fire News : अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; अग्निशामक दलाची ८ वाहने घटनास्थळी दाखल

यावेळी बोलताना उन्मेष पाटील म्हणाले माझी लढाई आत्मसन्मानासाठी आहे. अवहेलना झाल्यामुळे मी वेगळी भूमिका घेतली आहे. मी केलेल्या विकासाची भाजपला किंमत नाही. बदल्याचं राजकारण मनाला वेदना देणारं होतं. उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी नाराज नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

बावनकुळेंकडून संपर्क

दरम्यान, मंगळवारी मुंबईत या घडामोडी घडत असताना, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उन्मेष पाटलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पाटील यांना समजाविण्याचे प्रयत्न सुरू असून, ते भाजप सोडणार नाही, अशी अपेक्षा बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

अशी असू शकतील समीकरणे

उन्मेष पाटील करण पवारांच्या मागे पूर्ण ताकद उभी करतील

भाजपतील नाराजांची मोट बांधून त्यांची मदत घेतील

उन्मेष पाटलांच्या पाठबळाने भाजप उमेदवार स्मिता वाघांना तुल्यबळ लढत देता येईल

उन्मेष पाटील स्वत: चाळीसगाव विधानसभेसाठी ‘कमिटमेंट’ घेतील



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply