Ulhasnagar Crime : पत्नीला गुंगीचं औषध दिलं, नंतर अश्लील व्हिडिओ काढले; अन् मित्राला पाठवले..

 

Ulhasnagar Crime :पती - पत्नीचं नातं पवित्र मानलं जातं. आपल्या जोडीदाराला कुणी पाहिलं तरी आपला राग अनावर होतो. परंतु याच पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. आधी पतीने पत्नीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. नंतर पतीने पत्नीचे अश्लील फोटो आपल्याच मित्राला शेअर केले. या धक्कादायक घटनेनंतर उल्हासनगर हादरलं असून, पत्नीने आपल्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये पत्नीचे लैंगिक छळ आणि मारहाण केल्याप्रकरणी एका ४० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, उल्हासनगर पोलिसांनी या धक्कादायक घटनेनंतर महिलेची तक्रार नोंदवून सखोल तपास केला, नंतर आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत

नेमकं घडलं काय?

Malegaon Bajar Samiti Election : मालेगाव बाजार समितीत सत्ता पालट; ठाकरे गटाला धक्का देत शिंदे गटाचा विजय

उल्हासनगरमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पतीने आधी पत्नीला गुंगीचे पदार्थ खायला दिले. यानंतर ती नशेत बेशुद्ध होऊन पडली. याच संधीचा फायदा घेत पतीने तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो काढले. नंतर हेच फोटो आणि व्हिडिओ त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्राला पाठवले. महिलेने अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यास विरोध केला. मात्र, पतीने काही ऐकले नाही. तसेच पत्नीला मारहाण देखील केली

महिलेच्या म्हणण्यानुसार, या सर्व प्रकरणानंतर १७ जानेवारीला पतीच्या मित्राने तिला फोन करत अश्लील बोलला. याच त्रासाला कंटाळून महिलेने पोलीस ठाणे गाठण्याचे ठरवले. महिलेनं पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, कलम ७७, ७८, ११५ (२), ३५२ कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. तसेच पतीला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply