Ulhasnagar News: वैद्यकीय साहित्यअभावी रखडल्या शस्त्रक्रिया, सरकारी रुग्णालयात रूग्णांचा प्रश्न ऐरणीवर

Ulhasnagar : येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात ऑर्थोपेडिक इम्प्लांट ऑपरेशन रखडल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. तब्बल दीड ते दोन महिने झाले तरी शस्त्रक्रिया न झाल्याने अनेक रुग्ण रुग्णालयातच अडकून पडले आहेत.

उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयात कसारा, शहापूर, कल्याण ग्रामीण तसेच बदलापूर येथून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत येथे ऑर्थोपेडिक इम्प्लांट शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, या योजनेच्या बिलांची थकबाकी असल्यामुळे पुरवठादारांनी साहित्य देण्यास नकार दिला आहे. परिणामी, शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेले रॉड आणि अन्य साहित्य उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

Central Railway : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता १५ डब्ब्यांच्या लोकल दुप्पट होणार

रुग्णांचे दीड-दोन महिन्यांपासून हाल

पायात रॉड बसवण्यासाठी दाखल झालेल्या अनेक रुग्णांना गेल्या दीड-दोन महिन्यांपासून उपचार मिळू शकलेले नाहीत. हातावर पोट असणाऱ्या या रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडणारे नाही. परिणामी, ते मध्यवर्ती रुग्णालयात उपचाराविना दिवस काढत आहेत.

या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उत्कर्ष दुधेडिया यांनी योजनेच्या निधीअभावी ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगितले. मात्र, सरकारी यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णांचे हाल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रुग्णांचे जीव टांगणीला लागले असून, त्यांच्यावर उपचार कधी होणार आणि जबाबदारी कोण घेणार, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता प्रशासन यावर तातडीने उपाययोजना करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply