Ulhasnagar Crime : दुचाकीवरून येत मोबाईल हिसकावून ठोकली धूम; उल्हासनगरात पहाटेची घटना

Ulhasnagar : उल्हासनगरमध्ये पादचारी देखील सुरक्षित राहिले नसल्याचा अनुभव आला आहे. दुचाकीवरून आलेल्या २ चोरट्यांनी रस्त्यावरुन चाललेल्या तरुणाच्या हातातील मोबाईल खेचून धूम ठोकल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली. मात्र या घटनेला आठवडा उलटूनला. तसेच सीसीटीव्ही फुटेज समोर येऊनही मध्यवर्ती पोलिसांनी मात्र गुन्हा दाखल करण्याऐवजी मोबाईल मिसिंगची नोंद केली आहे.

मागील काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगलपोत तोडून नेण्याच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. यामुळे रस्त्याने पायी चालणारे देखील सुरक्षित नसून त्यांची भररस्त्यावर लूटमार केली जात आहे. त्यानुसार रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणाच्या हातातून मोबाईल हिसकावून नेण्यात आला आहे. शहरात घडत असलेल्या या किरकोळ घटनांना आळा बसणे गरजेचे झाले आहे.

Mumbai-Pune Express Way : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ५ वाहनांना विचित्र अपघात, बोगद्यात टेम्पो उटल्याने वाहतूक कोंडी

चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील पंजाबी कॉलनी परिसरातील रस्त्यावर ८ फेब्रुवारीला पहाटे सुमित राय हा तरुण कामावरून घरी येत होता. सुमित हा मोबाईल पाहात पायी चालत असताना त्याच्या मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्या हातातला मोबाईल हिसकावला आणि पसार झाले होते. दरम्यान हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाला.

पोलिसात मोबाईल मिसिंगची नोंद

दरम्यान या घटनेला आठवडा उलटून देखील मध्यवर्ती पोलिसांनी अद्याप मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिसांनी केवळ मोबाईल मिसिंगची नोंद केली आहे. सुमित राय याने काही महिन्यांपूर्वीच लोनवर नवीन फोन घेतला होता. तोच फोन चोरट्यांनी चोरून नेल्यानं आणि पोलिसांनीही गुन्हा दाखल न केल्यानं सुमित हवालदिल झाला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply