Ulhasnagar Crime : उल्हासनगरात जबरी लूट; ३ लाखांची रोकड लांबविणाऱ्या दोघांना अंबरनाथमधून अटक

Ulhasnagar : रात्रीच्या सुमारास रोकड घेऊन घरी जात असलेल्या एका इसमाजवळ असलेली रोकड घेऊन दोघेजण पसार झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ३ लाख रुपयांची रोकड घेऊन पसार झालेल्या दोघांना उल्हासनगर क्राईम ब्रँचने २४ तासात बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांना अंबरनाथ येथून ताब्यात घेतले आहे.

उल्हासनगरच्या मराठा सेक्शन भागात राहणारे शरद सिंग हे अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानात आयोजित फन फेअरचे मॅनेजर म्हणून काम करतात. या फन फेअरमध्ये दिवसभरात जमा झालेली ३ लाख रुपयांची रोकड घेऊन सोमवारी मध्यरात्री ते गाडीने अंबरनाथहून उल्हासनगरला आपल्या घराकडे निघाले होते. या दरम्यान त्यांच्यावर नजर ठेवून दोघेजण पाठलाग करत सिंग यांच्या घरापर्यंत पोहचले.

गाडीतून उतरताच घातली झडप

उल्हासनगरच्या मराठा सेक्शनमध्ये शरद सिंग हे घरात शिरत असतानाच त्यांच्या मागावर असलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्याजवळील ३ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून पसार झाले. अचानक घडलेल्या प्रकरणानंतर शरद सिंग यांनी पोलिसात धाव घेतली. यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटविली.

Worker Death : सेप्टिक टँक साफ करायला गेले अन् झाला घात, कामगाराचा गुरमरून मृत्यू


अंबरनाथमधून दोघे ताब्यात

उल्हासनगर क्राईम ब्रँचने अवघ्या २४ तासात अंबरनाथमधून २ चोरट्यांना बेड्या ठोकल्या. अक्षय भीमराव चलवादी, अबी अरबाज अब्दुल सलाम शेख उर्फ पापा अशी दोघांची नावं आहेत. उल्हासनगर क्राईम ब्रँचचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे यांच्यासह गणेश गावडे, पिंट्या थोरवे, वाघ यांनी या दोघांना अंबरनाथ पश्चिमेच्या म्हाडा कॉलनी भागातून अटक केली. त्यांच्याकडून ४५ हजार ६०० रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून त्यांना पुढील कारवाईसाठी विठ्ठलवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply