Ulhasnagar : खिडकीत बसलेली दोन मुले दुसऱ्या मजल्यावरून कोसळली; ग्रील तुटल्याने घडली घटना

Ulhasnagar : घरात खेळत असलेली दोन चिमुकले घरातील खिडकीत बसून बाहेर गंमत पाहत होती. खिडकीत खेळत असताना बाहेरून लावलेली लोखंडी ग्रील अचानक तुटल्याने तोल जाऊन दोन्ही मुले दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळली. उल्हासनगरमध्ये घडलेल्या या घटनेत दोन्ही मुले जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील गांधी रोडवर परिसरात सदरची घटना घडली आहे. गांधी रोड परिसरात हरे कृष्णा इमारत असून त्यातील दुसऱ्या मजल्यावर फ्लॅटमधून हे दोन्ही मुले खाली कोसळली आहेत. फ्लॅटमध्ये खेळत असताना दोन्ही चिमुकले खिडकीत बसून खेळत होते. खिडकीच्या ग्रीलला धरून बसले असताना अचानक लोखंडी ग्रील तुटली. यामुळे दोघांचाही तोल गेल्याने ते खाली जमिनीवर कोसळले.

Santosh Deshmukh Case: धाराशिवच्या कळंबमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला होता महिलेचा मृतदेह, बीड कनेक्शन आलं समोर

दोघे रुग्णालयात दाखल

जमिनीवर पडल्याने दोघेजण जखमी झाले आहेत. यात एक सात वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी आहे. त्यापैकी सात वर्षीय मुलाचे दात पडले असून डोक्यालाही इजा झाली आहे. तर मुलीला किरकोळ इजा झाली आहे. दोघांना लागलीच जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून या दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुदैवाने जीव वाचला

घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत मुलांना उचलले. तसेच मुलांचे आई- वडिलांनी त्यांना रुग्णालयात नेले. सुदैवाने बिल्डिंगच्या कंपाउंडला असलेल्या पत्र्यांवर ही ग्रील कोसळल्याने मुलांचा जीव वाचला आहे. तसेच दुसऱ्या मजल्यावरून अस्लेल्यूए फ्लॅटची जास्त उंची नसल्याने मुलांचा जीव वाचला आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply