Ulhasnagar : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका सतर्क, अतिधोकादायक 5 इमारतींवर फिरविला जेसीबी; 316 वास्तू धाेकादायक

Ulhasnagar : उल्हासनगर शहरात 316 धोकादायक इमारतींची यादी महापालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. यामध्ये 5 इमारती अतिधोकादायक वर्गातील असून त्या पाडण्याचे काम उल्हासनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रारंभ झाला आहे. तसेच 43 इमारती रिकाम्या करून त्यांची दुरुस्ती करण्याची गरज पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींची संख्या घटली आहे. गेल्या वर्षात 310 इमारती धोकादायक यादीत होत्या. शहरातील अति धोकादायक इमारतीत मिनर्वा पॅलेस अपार्टमेंट, रुपानी महल अपार्टमेंट, गंगासागर अपार्टमेंट, पवनधाम अपार्टमेंट या इमारतींवर उल्हासनगर महापालिकेकडून तोडक कारवाई केली जात आहे.

Pune News : मनोज जरांगेंच्या अटक वॉरंट प्रकरणात पुणे कोर्टाचा मोठा निर्णय!

आगामी काळातील पावसाळा लक्षात घेता इमारत कोसळून लगतच्या नागरिकांना धोका होऊ नये यासाठी महापालिकेने अतिधाेकादायक इमारती निष्कासीत करण्यास प्रारंभ केला आहे. शहरातील इतर भागात देखिल टप्या टप्प्याने धोकादायक इमारती निष्कासीत करण्यात येणार आहेत अशी माहिती महापालिकेतून देण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply