Ujani Dam Boat Overtured : पाहुण्याच्या जागरण गोंधळ कार्यक्रमाला निघाले, मध्येच वादळ आलं अन् बोट बुडाली; सहा जण बेपत्ता

Ujani Dam Boat Overtured : सोलापूर जिल्ह्यातून धक्कादायक माहिती  बातमी समोर आली आहे.  सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात एक बोट बुडाली आहे. यात सहा जण कालपासून बेपत्ता  आहे. बोटीत एकूण सातजण होते. त्यातील एक पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे हे पोहून काठावर पोहचले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला मात्र सहा जण अजूनही बेपत्ता आहे. आज सकाळीच लवकर उजनी जलाशयात शोधमोहीम सुरू झाली असून NDRF टीम देखील तपास कामाला लागली आहे ..अजून कोणाचाही शोध लागला नाही. शोधमोहिम अजूनही सुरुच आहे. 

या जलाशयात एकूण सहा जणांचा शोध सुरु आहे. सहाही प्रवासी करमाळा तालुक्यातील आहे. करमाळा तालुक्यातील झरे तालुक्यातील  जाधव दाम्पत्य आणि त्यांची दोन लहान मुले यांचा समावेश आहे. त्यासोबतचआदिनाथ साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचा तरुण मुलगा गौरव डोंगरे याचादेखील शोध सुरु आहे. कुगावं येथील रहिवासी असलेला बोट चालक पाण्यात बेपत्ता आहेत. या सगळ्यांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. 

Pune Porsche Car Accident : कोझी बार आणि ब्लॅक पब सील, राज्य शुल्क विभागाची कारवाई; बार मालकांना ४ दिवसांची पोलिस कोठडी

नेमकं काय घडलं?

काल सायंकाळी डोंगरे आणि जाधव कुटुंब इंदापूर तालुक्यातील अजोती येथे पाहुण्याच्या जागरण गोंधळ कार्यक्रमाला निघाले होते.कुगावकडून कळाशीच्या दिशेने जाणारी बोट मध्यभागी नदीपात्रात आल्यानंतर अचानक हलका पाऊस व जोरदार वारा सुटला. त्यामुळे रौद्ररुप धारण केलेल्या लाटांचे पाणी बोटीत शिरले व बोट जागेवर फिरली. बोटीत पाणी शिरल्याने दोन चिमुकले सोडून सर्वजण बोटीतून पाण्यात उतरले. त्यावेळी त्या सर्वांनी बोटीला सावरण्याचा प्रयत्न केला. हा जीवन मरण्याचा संघर्ष जवळपास 10 ते 10 मिनिटे सुरू होता. मात्र, जोराच्या वादळामुळे त्यांची झूंज अपयशी ठरली व पाणी शिरलेली बोट पात्रात बुडाली. यावेळी ग्रामीण पोलिसांच्या जिल्हा विशेष शाखेतील पोलिस उपनिरीक्षक डोंगरे यांनी पोहत पोहत काठ गाठला आणि स्वतःचा जीव वाचविला. मात्र सहा जण पाण्यातच तरफडत होती.

गोकूळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल गोकूळ जाधव (वय 25), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय 3, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील अनुराग अवघडे (वय 35) व गौरव डोंगरे (वय 16) अशी बेपत्ता असणाऱ्यांची नावं आहेत. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply