Ujani Dam : उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग; सोलापूर शहरातील सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी निर्णय

Pandharpur : यंदा चांगला पाऊस झाल्याने उजनी धरणात मुबलक असा पाणी साठा साचला आहे. दरम्यान सोलापूर शहराला भीमा नदीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र नदी पात्रातील पाणी आटले असल्याने सध्या सोलापूर शहरासह आजूबाजूच्या गावांना पाणी समस्या भेडसावू लागली आहे. या अनुषंगाने सोलापूर शहरासह भीमा नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी आजपासून उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे.

राज्यात यंदा चांगला पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील बहुतांश धरणात मुबलक असा पाणी साठा झाला आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात देखील मुबलक पाणी साठा असून या धरणातील पाण्यामुळे सोलापूर शहरवासीयांची तहान भागत असते. दरम्यान भीमा नदी आता कोरडी पडल्याने सोलापूर शहराला होणार पाणी पुरवठा कमी दाबाने करावा लागत आहे. शिवाय आगामी काळात पाणी समस्या अधिक जाणवू नये यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.

Andheri Railway Station : कौतुकास्पद! रेल्वेत चढताना घसरला पाय, जवानाच्या प्रसंगावधानाने प्रवाशाचा वाचला जीव

१६०० क्युसेकने सोडले पाणी

सध्या सोलापूर शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला‌ जातो. पुढे उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे पाणी संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. आगामी काळातील पाणी टंचाई विचारात घेऊन उजनी धरणातून भीमा नदीद्वारे पाणी सोडले आहे. आज धरणातून १६०० क्युसेक इतके पाणी सोडले आहे. यामुळे नदीद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठा सुरळीत राहू शकेल.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने भीमा नदीला पूर आला आहे. यामुळे नदी काठच्या सर्व नागरीकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील शेती पंप, नदीकाठच्या शेती, अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ काढण्याच्या सूचना ही पाटबंधारे विभागाने दिल्या आहेत.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply