Uddhav Thackeray Latest Speech : रामलल्ला तुमची संपत्ती आहे का? उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray Latest Speech : देशात राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची तयारी सुरु झाली आहे. श्रीराम मंदिराचं उद्घाटन २२ जानेवारीला होणार आहे. या सोहळ्यासाठी भाजपने विशेष तयारी केली आहे. दुसरीकडे याच श्रीराम मंदिराच्या श्रेयवादावरूनही राजकारण सुरु झालं आहे. याचदरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. रामलल्ला तुमची संपत्ती आहे का,असा सवाल करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

उद्धव ठाकरे यांनी यादव समाज सेवा संस्थेच्या मीरा भायंदर येथे आयोजित गोवर्धन पुजेला हजेरी लावली. या कार्यक्रमात उपस्थित उत्तर भारतीयांशी संवाद साधला. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले, 'यादव सेवा संस्थेला मी धन्यवाद देऊ इच्छितो. मला तुमच्या कार्यक्रमात आपलं मानून बोलावलं. आता आपलं कोणाला मानायचं हे आता कठीण झालं आहे. कालपर्यंत आपल्या घरात वावरला, तो आज आपला विरोधक म्हणून समोर आलाय'.

JN.1 Covid Cases : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं; ठाण्यात एकाच दिवशी ५ रुग्ण; राज्यभरात ९ रुग्णांची नोंद

उत्तर भारतीय आणि मराठी माणूस दूधसारखेसारखा : उद्धव ठाकरे

'आपला धनुष्यबाण चोरला. महाभारतात कृष्णाने आपल्याला शिकवण दिली, जो कोणी आपल्या विरोधात आला, त्याचा पराभव करायचा. मी भारतीय जनतेत भगवान कृष्ण पाहतो. मी तुम्हाला वचन देतो. आजची सभा राजकीय नाही. यादव आणि आपल्यात दूध साखरेचं मिश्रण आहे. पण त्यात मीठ कोण टाकतंय हे बघा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

'मी कोविड काळात वाचवलं असं तुम्ही म्हणताय. शिवसेनेने कोविड काळात सर्व हिंदूंना वाचवलं. आता राम मंदिराचं उद्घाटन होत आहे. ही आनंदाची बाब आहे. त्यावेळेस जेव्हा राम मंदिर पाडलं, तेव्हा शिवसेना पुढे होती. त्यावेळी भाजप कुठे नव्हतीच,असेही ते म्हणाले.

ठाकरेंची भाजपवर टीका

'काही राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. त्यावेळेस सांगितलं की, भाजपला मत दिलं तर रामलल्लाचं मोफत दर्शन करणार. रामलल्ला तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे काय? आमचं हिंदुत्व हृदयात राम आणि हाताला काम असं आहे. भाजपला मत दिलं तर मोफत रामलल्लाचं दर्शन, हे कसलं हिंदुत्व? महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला घेऊन जात आहेत. सूरत मजबूत होगा, तो देश मजबूत होगा म्हणत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply