Uddhav Thackeray : आमदार, खासदार फोडले, पण निष्ठावंत अजूनही माझ्यासोबत... नगरमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली!

Uddhav Thackeray :  शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे जनसंवाद मेळाव्याला संबोधित केले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटासह भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"हा आपला कुटुंब संवाद मेळावा आहे. काय बोलावं हा प्रश्न, तुमच्या स्वागताने भारावून गेलोय. इकडे सर्व टोप्या घालून बसलेत, मी उद्धव ठाकरेंसोबत आहे. भाजपला हेच कळत नाही, खासदारदेखील फोडला, पण निष्ठावंत माझ्यासोबत आहेत. आता इथे येणारे गढूळ पाणी यांनाच पाजावे लागेल," असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Konkan Politics : नारायण राणे असाे अथवा... लाेकसभा निवडणुकीत विनायक राऊतांची हॅट्रीक निश्चित : राजन साळवी

"दुष्काळ असतांनाही निळवंडे धरण पूर्ण होऊनही पंतप्रधान यांची वेळ मिळत नव्हती म्हणून पाणी सोडलं नाही. आता काम पूर्ण झाल्यावर उद्घाटन करायला येतील. त्यांना उद्धव ठाकरेंच्या गॅरंटीचे लोकार्पण करायला यावं लागतंय. आता या गद्दार खासदाराला भाजपने तिकीट देवूनच दाखवावं," असा टोलाही त्यांनी खासदार सदाशिव लोखंडे यांना लगावला.

लोकशाही कायम ठेवण्यासाठी एकत्र...

"देशाची लोकशाही कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र या. गावागावात यांचे रथ फिरत आहेत,ते हुसकावूनच लावले पाहिजेत. त्यावर भारत सरकार नाही तर मोदी सरकार लिहिलं होत. उद्या हे देशाचं देखील नाव बदलतील. भाजपचा झेंडा हा आमचा राष्ट्र ध्वज होऊ शकत नाही," असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply