Uddhav Thackeray : २२ जानेवारीला दिवाळी साजरी करा, पण देशाचं दिवाळं निघालं त्याचं काय?;

Uddhav Thackeray : राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी येत्या २२ जानेवारीला संपूर्ण देशात दिवाळी साजरी केली जाणार आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा देखील केली आहे. त्यावरून आता उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं आहे. दिवाळी साजरी करा. पण देशाचं दिवाळं निघालं त्याचं काय?, असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन आहे. त्यामुळे सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे, ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्यानंतर गेल्या १० वर्षांत आतापर्यंत किती दिवाळं काढलं? ते या सरकारने सांगावं अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधलाय

Uday Samant On Uddhav Thackeray MLA : ठाकरे गटाचे आमदार आमच्याकडे येणार, उद्यापासून काय होतेय ते पाहा, उदय सामंतांचा मोठा दावा

राम मंदिराचं उद्धाटन झाल्यानंतर गेल्या काही वर्षांत जे दिवाळं वाजलं आहे, त्यावर देखील चर्चा झाली पाहिजे. मग तुम्ही चाय पे चर्चा करा, फरसाणवर करा किंवा ढोकळावर चर्चा करा, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आहे.

येत्या 22 जानेवारीला आम्ही नाशिकला काळाराम मंदिरात जाऊन श्री रामाचे दर्शन घेणार आहोत. तसेच गोदावरी काठावर आरती करणार आहोत. 23 तारखेला कार्यकर्त्यांचे अधिवेशन आणि संध्याकाळी जाहीर सभा असणार आहे, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

राम मंदिराच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना काही माहिती नाही. आम्ही जेव्हा अयोध्येत होतो तेव्हा ते तिथे होते का? त्यांचं अज्ञान दूर करायला मी येथे आलो नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply