Uddhav Thackeray : 'ऑपरेशन टायगर' उद्धव ठाकरे रोखणार? डॅमेज कंट्रोलसाठी कोणता मेगा प्लान आखलाय? वाचा

 

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला बसलेला फटका पाहता आता ठाकरे सावध झालेत...डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे गटानं सावध भूमिका घेतलीय...ठाकरे गटाच्या सर्व नेत्यांची शिवसेना भवनात आढावा बैठक घेतली जाणार आहे..येत्या काळात संघटनात्मक बदल सुद्धा अपेक्षित आहेत. त्यामुळे जागे झालेल्या ठाकरेंनी काय मेगा प्लॅन आखलाय पाहूया...

राज्याचं राजकारण सध्या शिंदेंभोवती फिरतंय...कधी ते नाराज असतात तर कधी फडणवीसांसोबत कोल्डवॉर रंगतंय...त्यातच ऑपरेशन लोटसप्रमाणे ऑपरेशन टायगरची घडलंय त्यातून ठाकरेंना धक्के देत शिंदेंनी माजी आमदार राजन साळवींना गळाला लावलं.

ठाकरेंना डॅमेज,शिंदेंकडे कंट्रोल

कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात

माजी आमदार सुभाष बने शिंदे गटात

CBSE New Rule : दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा? सीबीएसई नवा नियम लागू करण्याच्या तयारीत

मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा आणि माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

त्यामुळे पक्षाला नेत्यांसोबत पदाधिकारी जात असल्याचा धक्का बसत असताना आपला जुना शिवसैनिक आपल्या सोबत टिकून राहावा आणि पक्ष अधिक बळकट करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची धावाधाव सुरू झालीये..एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर मोडून काढायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून खास रणनीती ही त्यांनी आखलीये. सध्या ठाकरे गटात नेतेपदी 14 जण, उपनेतेपदी 43 जण, सचिवपदी 10 जण आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलीये...

डॅमेज कंट्रोलसाठी मास्टर प्लान

प्रत्येक मंगळवारी सेनाभवनात आढावा बैठक

प्रमुख नेते राज्यभर दौरे करणार

नाराज पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेणार

पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करणार

ठाकरे गटात संघटनात्मक बदलाची शक्यता

जो बुंद से गयी वो हौद से नहीं आती या म्हणीचा अर्थ एव्हाना ठाकरेंना लक्षात आला असावा आणि देर आये दुरुस्त आए असंच ठाकरेंबद्दल म्हणावलं लागेल.

त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर शिंदे विरुद्ध ठाकरेंची राजकीय जुगलबंदी पाहाणं रंजक असेल. यातून भविष्यात तयार केली जाणारी रणनीती ठाकरेंच होणार आउटगोइंग थांबवणार का? की ठाकरे सेनेला शिंदे धक्का देऊन सुपडासाफ करणार का हेच पाहायचं?



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply