Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांना 'कंसमामा'ची उपमा; राष्ट्रपतींकडे शक्ती कायदा लागू करण्याची मागणी, आंदोलनात ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray  : शरद पवार गट, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांचा समावेश असलेले मविआ राज्यभर निदर्शन करत आहेत. बदलापूर शाळेत २ मुलींवर लैंगिक अत्याचार झाला. या विरोधात शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणात न्याय मागितला आहे. उद्धव ठाकरेंनी दादरमधील शिवसेना भवनासमोर निषेध आंदोलन केले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींकडे शक्ती कायदा लागू करण्याची मागणी केली आहे.


बदलापूर प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी दादरमधील शिवसेना भवनासमोर आंदोलन केले आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थितांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, लेकीबाळीच्या सुरक्षेसाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे. आपण अजूनही जिवंत महाराष्ट्रात आहोत, हे ह्या आंदोलनातून तुम्ही दाखवून दिल आहात. सरकारमध्ये हिंमत नाही. गुन्हेगारांना ते पाठीशी घालत आहेत. निर्धावलेलं सरकार आपल्यावर राज्य करत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

Pune Crime: सोशल मीडियावरून मैत्री, वारंवार अत्याचार, नंतर गर्भधारणा, 14 वर्षीय मुलीसोबत जे झालं त्यानं पुणे हादरलं


यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, नराधमांना तर शिक्षा झालीच पाहिजे, पण त्यांना पाठीशी घालणान्यांनासुद्धा शिक्षा झाली पाहिजे. जरी तुम्ही आमच्या बंदला बंदी केली असली, तरी आज महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयामध्ये, प्रत्येक घरामध्ये ह्या अत्याचारविरुद्ध मशाल धगधगत आहे. त्यामुळे मी राज्यातल्या तमाम जनतेला आवाहन करतो, आपापल्या गावागावात, शहरात 'बहीण सुरक्षित, घर सुरक्षित' अशी स्वाक्षरी मोहीम घ्या, असं आवाहन ठाकरेंनी केले आहे.


तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यानी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, एका बाजूला बहिणीवरती अत्याचार होतोय आणि एका बाजूला कसमामा राख्या बांधत फिरत आहेत. आजचं आआंदोलन विकृती विरुद्ध संस्कृतीचं आहे. यामुळे आता मी महामहीम राष्ट्रपतींना विनंती करतो, धूळ खात पडलेला 'शक्ती कायदा' अंमलात आणा. सरकार निर्लज्जपणे वागत आहे. ह्या सरकारला घालवावंच लागेल; आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल. सरकारमध्ये हिंमत नाही. गुन्हेगारांना ते पाठीशी घालत आहेत. निविलेलं सरकार आपल्यावर राज्य करत आहे, असं ते म्हणाले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply