Uddhav Thackeray : पहाटे 5 वाजले तरी मतदान करा, रांगेतून हटू नका; उद्धव ठाकरे यांचं मतदारांना आवाहन

Uddhav Thackeray :एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी राज्यातील 13 जागांवर मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले आहेत की, ''मतदान केंद्रावर दिरंगाई सुरु आहे. मतदान केंद्रात गेल्यावर मतदारांना तुमचं नाव काय? तुमच्या भावाचं नाव काय, असं म्हणत वेळ घेतला जात आहे. मतदारांना केंद्रात फोन आणू नका सांगितलं जात आहे. हे आधीच मतदारांना सांगायला हवं होतं''

निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा सुरू, असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी मतदारांना मतदान केंद्रातून मतदान केल्याशिवाय बाहेर पडू नका, असं आवाहन केलं आहे.

Jalgaon Crime : सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत जळगावमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, लाखोंचं सोनं लंपास

'सकाळी पाच वाजले तरी मतदान केल्याशिवाय मतदान केंद्र बंद करता येणार नाही'

निवडणूक आयोग आणि मोदी सरकारवर आरोप करत उद्धव ठाकरे म्हणाले की, ''मशिन बंद पाडले जातात. अधिकारी विलंब करतायेत.हा मोदी सरकारचा डाव आहे. ते पराभवाच्या भीतीने पछाडले आहेत. लोक उत्साहाने बाहेर पडले आहेत. त्यांना जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. हा निवडणूक आयोगाकडून खेळला जाणारा खेळ आहे.''

ते म्हणाले, ''जिथे आमचा टक्का अधिक होणार आहे, तिथे मतदान कमी होतंय. विलंब होतो मी मतदारांना विनंती करतो की, सकाळी पाच वाजले तरी मतदान केल्याशिवाय मतदान केंद्र बंद करता येणार नाही.

''ठाकरे म्हणाले,मतदारांत खूप उत्साह. पण निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय. दिरंगाई केली जातंय. विशिष्ट वस्त्यांमध्ये वारंवार ओळखपत्र विचारले जातंय. मोदी सरकार पराभवाच्या भितीने निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करत आहे.''

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply