Uddhav Thackeray : कोर्लई येथील १९ बंगले घोटाळा प्रकरणी ठाकरेंच्या अडचणी वाढणार?; ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल

राज्यात सत्तासंघर्षावरून राजकारण तापलेले असतानाच 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायती अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे, यामध्ये सरकारी रेकॉर्डमध्ये खाडोखोड करुन फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्यांची चौकशी केली जाईल. तसेच हे मुळ १९ बंगले कोणाचे आहेत. याचा ठाकरेंशी संबंध आहे का याचा शोध घेतला जाईल.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या बंगल्याशी उद्धव ठाकरेंशी संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. यादरम्यान ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या चौकशीतून काही माहिती समोर आली तर ठाकरे कुटुंबाकडून देखील माहिती घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जातील. यामुळे उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या अडचणी वाढू शकतात.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रायगड जिल्ह्यातील कोर्लईत उद्धव ठाकरे यांनी संपत्ती घेतली आहे. या संपत्तीचा हिशोब ठाकरे कुटुंबाला द्यावा लागेल, याचा पुनरुच्चार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

सोमय्या यांनी कोर्लईतील 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी ग्रामविकास अधिकारी, बीडीओवर रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एफआयआर क्रमांक 26, IPC Sections 420, 465, 466, 468 आणि 34 नुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सोमय्या यांनी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

मुरुडच्या ग्रामविकास अधिकारी संगिता लक्ष्मण भांगरे यांनी कोर्लई ग्रामपंचायत अधिकार्‍यांविरुद्ध फसवणूक तसेच 19 बंगल्याच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे, अशी तक्रार रेवदंडा पोलीस स्टेशन येथे नोंदवली आहे अशी माहिती सोमय्या यांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply